कलर्स मराठी वरील ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे, वेगळं कथानक, नावाचं वेगळपण या मुळे सुरवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोन भिन्न परिस्थितीत असणाऱ्या दोन लोकांचं फुलत जाणार नातं या मालिकेत पाहायला मिळत आहे.(Sayaji Reva Wedding)
सया हा सुशिक्षित रांगडा मातीत राबणारा असा युवक आहे, आहे तर रेवा ही उच्भ्रू घरातील कॉर्पोरेट जगात वाढणारी मुलगी आहे, दोघ ही वेगळ्या वेगळ्या परिस्थिती मध्ये वाढले असले, तरी दोघांची नाळ मातीशी जोडलेली आहे. त्या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर समाजातील मुलींसमोर रेवा या पात्राने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, तसाच एक वेगळा दृष्टिकोन देखील पाह्यला मिळतो.
पहा रेवा आणि सयाजीच्या हळदीचे खास क्षण (Sayaji Reva Wedding)
अनेक अडथळ्यांना सामोरे जाऊन रेवा आणि सया त्यांच्या प्रेमाची कबुली देऊ शकले. अनेक स्वप्न उराशी बाळगून प्रेक्षकांची ही लाडकी जोडी मालिकेमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे, मालिकेत सध्या त्यांच्या लग्नाची धामधूम सुरु होणार आहे.(Sayaji Reva Wedding)
त्यांच्या या तयारीचे खास फोटोज सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचा हा लग्न सोहळा निर्विग्न पणे पार पडणार कि इथे ही त्यांना कोणत्या संकटाना सामोरे जावे लागेल हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. लग्न मधील त्यांचे खास लुक कसे असतील, इतर कार्यक्रमांमधील धमाल ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं कंप्लिट पॅकेज ठरणार आहे.
हे देखील वाचा : दोघात तिसरा…. रेवा आणि सयाजीच्या प्रेमात तिसऱ्याची एन्ट्री