मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तब्बल १६ तास शूटिंग, जेवणाकडेही दुर्लक्ष अन्…; ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती खालावली, म्हणाली, “मला श्वास घ्यायलाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 16, 2024 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Heena Khan Health Update

तब्बल १६ तास शूटिंग, जेवणाकडेही दुर्लक्ष अन्…; 'या' अभिनेत्रीची प्रकृती खालावली, म्हणाली, "मला श्वास घ्यायलाही..."

अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हिना खान लोकप्रिय अभिनेत्रीनपैकी एक आहे. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण या काळात तिला आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. तिने सोशल मीडियावर सांगितले की, ती रात्री शांतपणे जेवू शकत नाही आणि तिला श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. त्यामुळे अभिनेत्रीला मास्क लावून झोपावे लागत आहे. त्याचप्रमाणे तिची अनेक औषधेही सुरु आहेत. (Heena Khan Health Update)

हिना खानने इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत याबाबतची अपडेट शेअर केली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिला एक वेळचे जेवण देखील नीट जेवता येत नाही आहे. जेव्हा ती जेवायला बसते तेव्हा ती त्यावर लक्ष केंद्रित करु शकत नाही. कारण ती सलग १६ तास शूटिंग करत आहे आणि तिला आरामात बसून जेवायला पुरेसा वेळ मिळत नाही.

आणखी वाचा – अक्षराने जिंकलं भुवनेश्वरीचं मन, आता तरी करेल का तिचा सून म्हणून स्वीकार?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांनीही केलं कौतुक, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by ???????????????? ???????????????? (@realhinakhan)

याचबरोबर हिनाने असेही सांगितले की, आजकाल तिला रात्रभर मास्क लावून झोपावे लागत आहे. अभिनेत्रीला नीट श्वासही घेता येत नाही. त्यामुळे तिने चाहत्यांना तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. अनेक औषधांचे फोटो शेअर करत हिनाने सांगितले की, ‘ती दिवसाचे १६ तास शूटिंग करत आहे’. हिनाने चार दिवसांपूर्वी ईदचा एक व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अभिनेत्रीने तिची तब्येत बरी नसून घसा खूप दुखत असल्याचेही तिने सांगितले होते.

आणखी वाचा – अहिल्यादेवी किर्लोस्कर पारूच्या डोक्यावर ठेवणार मायेचा पदर, प्रीतमच्या मैत्रीचं आदित्यला कौतुक, मालिकेत येणार रंजक वळण

हा व्हिडीओ अभिनेत्रीने चित्रीकरणाच्या सेटवरुन शेअर केला होता, त्यामुळे ती त्याच लूकमध्ये दिसली. यावेळी अभिनेत्रीने या खास लूकसाठी कपाळावर सिंदूर लावला होता. हिना ‘शिंदा शिंदा नो पापा’ या पंजाबी सिनेमात दिसणार आहे. तसेच ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ या हिंदी-इंग्रजी द्विभाषिक चित्रपटातही ती दिसणार आहे, या चित्रपटाची ती सहनिर्माती देखील आहे.

Tags: bollywood actressheena khanheena khan healthHeena Khan Health Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Premachi Goshta Serial Update

'प्रेमाची गोष्ट'मध्ये कार्तिकचं सत्य सांगूनही इंद्राचा मुक्ताला दोष, सागरसमोर प्रकरण येताच घेणार का बायकोची बाजू?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.