शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमाची गोष्ट’मध्ये कार्तिकचं सत्य सांगूनही इंद्राचा मुक्ताला दोष, सागरसमोर प्रकरण येताच घेणार का बायकोची बाजू?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 16, 2024 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Premachi Goshta Serial Update

'प्रेमाची गोष्ट'मध्ये कार्तिकचं सत्य सांगूनही इंद्राचा मुक्ताला दोष, सागरसमोर प्रकरण येताच घेणार का बायकोची बाजू?

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. यापैकी ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला दिसतात. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची टीआरपीच्या शर्यतीतही चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मालिकेतील मुक्ता व सागरच्या जोडीचे बरेच चाहते आहेत. सध्या मालिकेत मुक्ता व सागर यांच्यात अबोला पाहायला मिळत असला तरी सई त्यांचा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असते. तर एकीकडे कार्तिक या राक्षसी वृत्तीच्या पात्रानं मालिकेला रंजक वळणावर नेऊन ठेवलं आहे. (Premachi Goshta Serial Update)

कार्तिकचा खरा चेहरा आता लवकरच सर्वांसमोर येणार आहे. कार्तिक खऱ्या आयुष्यात नेमका कसा आहे हे फक्त मुक्ताला माहीत असतं. त्यामुळे मुक्ता कार्तिकचं सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते. मात्र तिच्याकडे ठोस असे पुरावे नसतात. अशातच मालिकेच्या आगामी भागात मुक्ता कार्तिकचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे. मात्र कार्तिकबाबत मुक्ताने केलेल्या पर्दाफाशावर इंद्रा, स्वाती विश्वास ठेवत नाही. यावर उलट ते मुक्तालाच दोष देतात.

आणखी वाचा – तब्बल १६ तास शूटिंग, जेवणाकडेही दुर्लक्ष अन्…; ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती खालावली, म्हणाली, “मला श्वास घ्यायलाही…”

मुक्ता घरात एकटी असताना सागरचा विचार करत असते तेव्हा तिथे कार्तिक येतो. रूममध्ये मुक्ताशिवाय कोणी नाही याचा फायदा घेत कार्तिक मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यात आणि सागरमध्ये नवरा बायकोसारखं काही नाही. तुम्ही एकमेकांशी बोलत नाही हे मला माहित आहे. तुम्ही माझ्याकडे मनमोकळा करा. तुमचा एकटेपणा मी घालवतो असं म्हणून तो तिच्या अंगाला स्पर्श करतो. तेव्हा मुक्ता त्याला जोरात धक्का देते आणि जवळ येऊ नको असं ठणकावून सांगते. त्यानंतर ती कार्तिकच सत्य सर्वांसमोर आणण्याचा ठरवते आणि त्याला धमकी देऊन बाहेर निघून जाते.

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

आणखी वाचा – अक्षराने जिंकलं भुवनेश्वरीचं मन, आता तरी करेल का तिचा सून म्हणून स्वीकार?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांनीही केलं कौतुक, म्हणाले…

बाहेर जाऊन इंद्रा व स्वातीला मुक्त कार्तिकबाबत सर्व सांगते. पण इंद्रा यावेळी जावयाची बाजू घेते. दोघेही कार्तिकबाबत ऐकताच मुक्ताला दोष देतात. इंद्राचा राग अनावर होत ती मुक्ताच्या सणसणीत कानाखालीही मारते. मुक्ता खूप ओरडून सांगत असते की, हा माणूस मला चुकीचा स्पर्श करतो पण दोघींचाही तिच्यावर विश्वास नसतो. त्यानंतर स्वाती कार्तिकला समजावण्याचा प्रयत्न करते तेव्हा कार्तिक बायकोसमोर खोटं नाटक करत रडू लागतो. आता मला या घरात एका क्षणासाठी थांबायचं नाही असंही तो म्हणतो. आता कार्तिकचं सत्य सागरसमोर येणार का?, सागर मुक्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpremachi goshtaPremachi Goshta Serial Updatestar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Silence 2, Kaam Chalu Hai and Article 370 will be released on ott see the details

मनोज वाजपेयीचा ‘सायलेन्स’ ते राजपाल यादवचा ‘काम चालू है’, येत्या आठवड्यात ड्रामा, थ्रिलर व सस्पेन्सने भरलेले चित्रपट पाहता येणार, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.