गेल्या दशकापासून सहजसुंदर अभिनयाने व सोज्वळ सौंदर्याने प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या या सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्या सोशल मीडियावरदेखील चांगल्याच सक्रिय असतात. विविध लुक्समधील फोटो व डान्स व्हिडीओ शेअर करत ते कायम चर्चेत राहत असतात. अशातच त्यांच्या एका व्हिडीओमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. (Aishwarya Narkar Shared Dance Video On Instagram)
कलाकार हे सोशल मीडियावरून त्यांच्या आयुष्यातील अनेक खास प्रसंगे व किस्से शेअर करत असतात आणि कलाकार म्हटलं की कौतुकाबरोबर ट्रोलिंगदेखील आलंच. काही कलाकार सोशल मीडियावरील या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण काही कलाकार मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. यांपैकीच एक नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्या नेहमीच सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात. अभिनेत्रीने नुकताच एक डान्स व्हिडीओ शेअर केला. ज्या व्हिडीओखाली कमेंट्सद्वारे त्यांना काही प्रतिक्रिया आल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर ‘गुलाबी शरारा’ गाण्याचा ट्रेंड सुरू असून या ट्रेंडिंग गाण्यावर सगळेच कलाकार रील व्हिडीओ करत आहेत. अशातच ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनीदेखील या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केले आहे. मात्र काहींनी यावर नकारात्मक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली “एक डान्सर, एक जोकर” असं म्हणत नकारात्मक कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटला ऐश्वर्याने “परीवर चांगले संस्कार करा, तिला कसे बोलायचे ते शिकवा” असं म्हणत प्रतिउत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – अखेर रणदीप हुड्डा व लीन लैश्राम यांचा विवाहसोहळा संपन्न, लक्षवेधी पोशाख, पारंपरिक विधीने वेधले लक्ष
दरम्यान, ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्यांना अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही आल्या आहेत. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिनेदेखील कमेंट करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. तर काही नेटकऱ्यांनी “तुम्हा दोघांना पाहून खूप भारी वाटतं, तुम्ही दोघे खूप कमाल आहात, क्या बात है?, नेहमी असेच आनंदी राहा” अशा अनेक कमेंट्स करत त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे सांगितले आहे.