शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१२-१३ तास कळा सहन करणाऱ्या बायका वेड्या का?”, ‘सातव्या मुलीची…’चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “अतिशय फालतू…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 6, 2024 | 5:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satvi Mulgi audience expressed their displeasure over the new twist

Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेच्या नवीन ट्विस्टवर प्रेक्षकांची नाराजी

Satvya Mulichi Satavi Mulgi : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेते गेले काही दिवस एकामागून एक अनेक वळणं येत आहेत. गेले काही दिवस मालिकेत नेत्राच्या गरोदरपणाचे कथानक पाहायला मिळत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या कथानकातील एखादे वळण प्रेक्षकांना आवडले तर ते त्यावर आपली पसंती दर्शवतात. पण मालिकेतील एखादा ट्विस्ट आवडला नाही तर त्याबद्दलही प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच ‘सातव्या मुलीची…’ प्रेक्षकांनी मालिकेतील नवीन ट्विस्टवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi audienc reaction)

नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो आला होता. या प्रोमोमध्ये नेत्राला प्रसुतीकळा सुररु झाल्या असून अद्वैत तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आपल्या कारमधून नेत असल्याचे पाहायला मिळाले. नेत्राच्या काळजीने अद्वैत अगदी कासावीस होतो आणि देवीआईला हाक मारतो. तो भर पावसात हातगाडीवरुन तिला घेऊन जाताना दाखवले आहे, तेवढ्यात त्या गाडीचे एक चाक निखळते. अद्वैत मदतीसाठी हाक मारतो, तेव्हा एक महिला त्याच्या मदतीला धावून आली आणि ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती सारंगधर आहे. यापुढे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, नेत्रा देवीच्या मंदिरात जुळ्यांना जन्म देते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा –

मालिकेतील हा नवीन ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला असून काही प्रेक्षकांना मात्र हा नवीन ट्विस्ट आणि हा नवीन प्रोमो आवडला नसल्याचे म्हटलं आहे. नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये “या मालिकेने अंधश्रध्देची सीमा गाठली आहे” “लाज वाटली पाहिजे अशी मालिका दाखविणाऱ्या त्या नालायक लोकांना आपण काय दाखवतोय”, “हे असलं काहीतरी दाखवायचं सुनेवर सासूचे अत्याचार, सासऱ्याचे कांड, टीआरपीच्या नावाखाली चार-चार लग्न जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे”. “या मालिकांमुळे समाजातील महिला पुर्णतः मूर्ख बनत चालल्या आहेत”, “हे असलं बघूनच आपला समाज बिघडत चालला आहे”, “या असल्या भंगार मालिका दाखवायच्या बंद करा” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी वाचा –

गेल्या काही दिवसांपासून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मालिकेत विरोचकाच्या अंतावर या मालिकेचे कथानक अवलंबून होते. त्यामुळे आता शेवटी विरोचकाचा अंत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मालिकेत देवी आईच्या भूमिकेत अदिती सारंगधर दिसणार आहे.  अदिती सारंगधर या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.  आदितीने या आधी ‘लक्ष्य’ मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

Tags: marathi serialMarathi Serial Newssatvya mulichi satvi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
genelia deshmukh crying

रितेश देशमुखबरोबर लग्न केलं खरं पण महिन्याभरातच ढसाढसा रडू लागली होती जिनिलीया देशमुख, 'ती' एक गोष्ट सहन झाली नाही अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.