सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीच्या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी अखेर देवीआईच्या लेकींना यश, नेत्रा विरोचकाचे वशीकरण निकामी करणार, आता तरी विरोचकाचा अंत होईल का?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 13, 2024 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi zee marathi serial update netra succeed in fighting against Rupali's power

रुपालीच्या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी अखेर देवीआईच्या लेकींना यश, नेत्रा विरोचकाचे वशीकरण निकामी करणार, आता तरी विरोचकाचा अंत होईल का?

‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर आता त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे दिसत आहे. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत आहे.

राजाध्यक्ष कुटुंबातील अद्वैत, नेत्रा व इंद्राणी या तिघांव्यतिरिक्त रुपालीने घरातील सर्वांनाच तिच्या बाजून वश केल्यामुळे देवीआईच्या लेकी हतबल झाल्या आहेत. त्यामुळे आता काय करावे? हे त्यांना काळात नाहीये. अशातच मालिकेच्या कथानकाची उत्कंठा वाढवणारा प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे आणि या प्रोमोद्वारे नेत्रा व इंद्राणी रुपालीचा बंदोबस्त करताना दिसत आहे. रुपाली समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून वश करते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – पारूमुळे होणार अहिल्यादेवींचा गैरसमज, किर्लोस्कर बंगल्यापासून ठेवणार का तिला दूर?, मालिकेला मिळणार नवं वळण

रुपालीच्या या वश करण्याच्या युक्तीबद्दल आता नेत्रा व इंद्राणी यांना माहिती झाली असून या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा व इंद्राणी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकताना दिसत आहेत. त्यानंतर त्या दोघी व अद्वैत रुपालीच्या गळ्यात साखळदंड अरकवून तिला एका कालकोठरीत डांबतानाचे पाहायला मिळत आहे. यावेळी नेत्रा व इंद्राणी रुपालीला “त्रिनयना देवीच्या भक्तांनी तुला आता अडकवलं आहे. त्यामुळे आता मरेपपर्यंत इथेच राहायचं.” असं म्हणताना दिसत आहेत.

आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे काहीच दिवस शिल्लक, एकमेकांना आठवणही करुन दिली अन्…; कायमचे वेगळे होणार का?

त्यामुळे आता अखेर त्रिनयना देवीच्या लेकींना रुपालीच्या शक्तीविरुद्ध लढण्याचे तंत्र आता माहीत झाले असून रुपाली आता त्यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे आता नेत्रा व इंद्राणी राजाध्यक्ष कुटुंबियांना कसं सोडवणार?, रुपालीच्या या ताब्यात जाण्यामुळे विरोचकाचा अंत होणार का? हे मालिकेत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.     

Tags: marathi serialSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
"प्रत्येक गोष्टीवर तो…", लग्नाच्या ८ वर्षांनंतर नवऱ्याची ‘ती’ गोष्ट मृणाल दुसानिसला अधिक खटकते, म्हणाली, “माझ्या मतांचा…”

"प्रत्येक गोष्टीवर तो…", लग्नाच्या ८ वर्षांनंतर नवऱ्याची ‘ती’ गोष्ट मृणाल दुसानिसला अधिक खटकते, म्हणाली, “माझ्या मतांचा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.