बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People

अश्विन मुशरान यांच्या कारची एका स्कूटरला धडक बसली.

Munna Bhai Fame actor’s Car Hits Two People : दक्षिण गोव्यातील केपे परिसरात एका भीषण रस्ता अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात बॉलिवूड आणि थिएटर अभिनेता अश्विन मुशरान यांच्या कारची एका स्कूटरला धडक बसली. या दुर्घटनेत स्कूटरवरून प्रवास करणारे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी अभिनेता अश्विन मुशरान हे आपल्या पत्नीसोबत कारमध्ये उपस्थित होते. अपघातानंतर घटनास्थळी लगेचच स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली. दरम्यान, या घटनेशी संबंधित काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी झाला. अश्विन मुशरान आणि त्यांची पत्नी कारमधून प्रवास करत असताना समोरून वेगाने येणाऱ्या स्कूटरची त्यांच्या कारला धडक झाली. स्कूटरवर एक वडील आणि त्यांचा मुलगा प्रवास करत होते. धडक इतकी जोरदार होती की, दोघेही रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी अभिनेत्याच्या ३२ वर्षीय वाहनचालक वसंत पुटप्पा लामन याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या वेळी वसंत हाच कार चालवत होता. (Munna Bhai Fame actor’s Car Hits Two People)

आणखी वाचा : “खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, कारचा वेग आणि रस्त्यावरील वळणांची तांत्रिक परिस्थिती याचाही तपास केला जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अमोल कानेकर यांच्यासह काही स्थानिक नागरिकांनी अभिनेता अश्विन मुशरान आणि त्यांच्या पत्नीला घेरलं आणि अपघातावरून त्यांच्याशी तीव्र वाद घातला. या गोंधळाचा एक व्हिडीओ प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून, तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्थानिक नागरिक अपघाताबद्दल संताप व्यक्त करताना दिसत आहेत. (Munna Bhai Fame actor’s Car Hits Two People)

अश्विन मुशरान हे भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आणि व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फॅशन’ आणि ‘क्विक गन मुरुगन’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अश्विन मुशरान हे प्रसिद्ध अभिनेता विवेक मुशरान यांचे चुलत भाऊ असल्याचं सांगितलं जातं. अश्विन यांचा बराचसा वेळ गोव्यातच जातो. दरम्यान, या अपघाताबाबत आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत अश्विन मुशरान यांच्या बाजूने अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य किंवा प्रतिक्रिया समोर आलेली नाही.(Munna Bhai Fame actor’s Car Hits Two People)

आणखी वाचा : ‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

Tags: bollywood newsentertainmentlage raho munnabhaiMunna Bhai Fame actor's Car Hits Two People
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Next Post
Monsoon Kitchen Tips

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? 'या' किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.