‘बिग बॉस मराठी’चे ५ चे पर्व ऑक्टोबर महिन्यात संपलं असलं तरी या सीझनमधील स्पर्धकांची आजही चर्चा होत असते. या पर्वातील अनेक स्पर्धक या ना त्या कारणाने चर्चेत राहत असतात. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतरही त्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावतो आहे. मूळचा बारामतीचा असलेल्या सूरजने ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यसाठी सूरज चव्हाणे पुन्हा त्यांची भेट घेतली. (Suraj Chavan wished Ajit Pawar)
सूरज चव्हाण हा थेट अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचला, त्याने त्यांच्यासाठी खास भेटही आणली होती. दोघांमध्ये काही वेळा गप्पा रंगल्या. यावेळी अजित पवार यांनी सूरजच्या घरासंदर्भातही अपडेट घेतली आणि पुढील नऊ महिन्यात सूरज याचं घर पूर्ण होईल असं आश्वासन देखील यावेळी अजित पवार यांनी सूरजला दिलं. त्यांच्या या भेटीवेळी सूरज खूप आनंदी दिसला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सूरजने यावर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीची गौतम बुद्धांच्या प्रवासाशी तुलना, म्हणाली, “माझ्या आध्यात्मिक मार्गावर…”
यावेळी सूरज असं म्हणाला की, “दादांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला त्यांना भेटायचं होतं. त्यांना कधी भेटतोय असं झालं होतं. माझ्या घराचेही काम आता सुरु झाले आहे. काम जोरात सुरु आहे. दादा जे बोलतात ते करतातच. देवमाणूस आहेत दादा. नऊ महिन्यांत घर पूर्ण करणार असं दादांनी म्हटलं होतं. दादांचा शब्द आहे तो आणि ते आपला शब्द पूर्ण करणारच. त्यांना आज भेटायचे खास कारण म्हणजे त्यांना मला शुभेच्छा द्यायच्या होत्या”.
दरम्यान, आता ‘बिग बॉस’ नंतर सूरज पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम व युट्युब अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली आहे. सूरजबद्दल अजून एक बोलायचं म्हणजे लवकरच तो त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार आहे. आपलं स्वतःच हक्काचं घर असावं असं सूरज ‘बिग बॉस’च्या घरातही बोलताना दिसला. काही दिवसांपूर्वीच सूरजच्या घराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.