Amitabh Bachchan On Allu Arjun : सध्या बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ची क्रेझ असलेली पाहायला मिळतेय. बॉक्स ऑफिसवर छप्परफ़ाड कमाई करत अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ ने सर्वत्र हवा केली. जगभरात चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींना या चित्रपटाची भुरळ पडली आहे. अशातच थेट बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुष्पा २ पहिल्यनानंतर अल्लू अर्जुनचं भरभरुन कौतुक केलं आहे. अमिताभ बच्चन व अल्लू अर्जुन अनेकदा एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. यावेळी ‘पुष्पा २’ रिलीज झाल्यानंतर अमिताभ यांनी पुन्हा एकदा अल्लू अर्जुनचे कौतुक केले आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाला जगभरातून प्रतिसाद मिळत असताना बिग बींकडून कौतुक होणं ही कौतुकाची बाब आहे.
अमिताभ अल्लू अर्जुनची स्तुती करताना म्हणाले, “अल्लू अर्जुन जी, तुमच्या प्रेमळ शब्दांनी मी खूप नम्र झालो आहे, तुम्ही मला माझ्या लायकीपेक्षा जास्त दिले आहे. आम्ही सर्वजण तुमच्या कामाचे आणि प्रतिभेचे मोठे चाहते आहोत. तुम्ही आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहा, तुमच्या अशाच यशासाठी तुमच्या माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा आहेत”.
वास्तविक, अमिताभ यांनी अल्लू अर्जुनच्या या व्हिडीओचे कौतुक केले आहे. ज्यामध्ये तो ‘पुष्पा 2’ अभिनेता बिग बीची खुलेपणाने प्रशंसा करत आहे. एका कार्यक्रमात अल्लूला विचारण्यात आले, “कोणता बॉलिवूड अभिनेता तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो?” यावर तो म्हणाला, “अमिताभ जी मला सर्वात जास्त प्रेरित करतात. मला अमिताभ बच्चन सर्वात जास्त आवडतात कारण आपण त्यांचे चित्रपट बघत मोठे झालो आहोत. जसजसे आम्ही मोठे झालो तसतसा त्यांचा आमच्यावर खूप प्रभाव होता. त्यामुळे एका शब्दात सांगायचे झाले तर मी अमिताभजींचा खूप मोठा चाहता आहे”.
याआधीही अल्लू अर्जुनने ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट पाहून अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी एक लांबलचक नोट शेअर केली आणि लिहिले, “अमिताभ बच्चन जी, तुम्ही खरे प्रेरणास्थान आहात, तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत”.