Satvya Mulichi Satavi Mulgi Serial : झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. सध्या मालिकेत इंद्राणीची शक्तीसुद्धा ईशाकडे आहे हे समजल्यावर नेत्रा आणि अद्वैतमधे यावरून संवाद होतं. नेत्रा तिची चाललेली धडपड अद्वैतकडे व्यक्त करत सगळं सांगते. अद्वैतला त्याची चूक उमगते.
तेव्हाच घरात चारही बायकांचं एकमत होतं की घरातल्याना आपण एकत्र ठेवण्यातच खरा आनंद आहे. जिथे केतकी भरभरून बोलते आणि केतकीचा नवरा केदार घरात प्रवेश करतो. केदारची भूमिका अभिनेता अभिजीत केळकरने साकारली आहे. केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित उलगडलेलं नाही. याचाच एक प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये इंद्राणी आपल्या शक्तीने शेखरच्या मनातील गुपित काढण्याचा प्रयत्न करत आहे.
आणखी वाचा – 25 october Horoscope : कुंभ, मकर व मीन राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार भाग्याची साथ, अधिक जाणून घ्या…
या नवीन प्रोमोमध्ये शेखर मनातल्या मनात “केदार परत कसा आला? खोल दरीत पडूनसुद्धा तो जिवंत कसा? पण सगळ्यांना सत्य कळलं तर?” असं म्हणतो. त्याचे हे मनातले बोलणे इंद्राणी ऐकण्याचा प्रयत्न करते. मग ती ही गोष्ट नेत्राला सांगते. नेत्राला ती असं म्हणते की , “केदार आल्यापासून शेखर अस्वस्थ वाटत आहेत. गप्प गप्प आहेत” यावर नेत्रा इंद्राणीला असं म्हणते की, “तुम्हाला असं का वाटत आहे. मला तसं काहीच जाणवलं नाही”. यावर इंद्राणी नेत्राला उत्तर देत असे म्हणते की, “मला जाणवलं म्हणून मी त्याच्या मनातलं ऐकलं”.
दरम्यान, केदारच्या येण्याने घरात सगळे आनंदी असताना, इंद्राणीला शंका येते की शेखर काहीतरी लपवत आहे. ती नेत्राशी बोलते, आणि नेत्रा सावध होते. अशावेळी ईशाला दैवी संकेत मिळणार आहे की घरातल्या मैथिलीचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे आता केदारवरील संशय आणि संकेतातली व्यक्ती याचा काही ताळमेळ जुळेल का? नेत्रा येणाऱ्या नव्या संकटाशी तोंड देऊ शकेल का? दिवाळीत राज्याध्यक्ष कुटुंबातलं अजून कोणतं रहस्य उघडकीस येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आगामी भागात मिळू शकतात.