रविवार, जून 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पोटातील बाळ पाडण्याच्या इंद्राणीच्या सल्ल्यामुळे नेत्रा दुःखी, देवीआईच्या लेकींमध्येच मतभेद, विरोचकाने डाव साधला?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 24, 2024 | 9:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
पोटातील बाळ पाडण्याच्या इंद्राणीच्या सल्ल्यामुळे नेत्रा दुःखी, देवीआईच्या लेकींमध्येच मतभेद, विरोचकाने डाव साधला?

पोटातील बाळ पाडण्याच्या इंद्राणीच्या सल्ल्यामुळे नेत्रा दुःखी, देवीआईच्या लेकींमध्येच मतभेद, विरोचकाने डाव साधला?

छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  वेगळा विषय, वेगळा आशय तसेच हटके कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीच उतरली आहे. नेत्रा, विरोचक, त्रिनयनादेवी, रुपाली, अस्तिका या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. कलाकारांच्या अभिनयामुळे व कथेमुळे मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. मालिकेत एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक मालिकेत खूपच गुंतले आहेत.

मालिकेत सध्या नेत्राचे गरोदर दाखवण्यात आले असून तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच एक अंश आहे. आधी तिला याबाबत माहिती नसते. मात्र नुकत्याच झालेल्या भागातून तिच्या पोटातील बाळ हे विरोचकाचे अंश असल्याचा उलगडा झाला आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. मात्र नेत्रा व इंद्राणी त्रिनयना देवीवर विश्वास ठेवत तिच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे या परिस्थितीत खचून जात नाहीत. पण आता मालिकेत येणाऱ्या एका नवीन वळणामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – वृषभ, सिंह व कन्या राशीच्या लोकांना बुधवारी होणार धनलाभ, करिअरमध्येही मिळेल चांगलं यश, दिवस कसा असेल? जाणून घ्या…

झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे या मालिकेचा एक नावीम प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामुळे राजाध्यक्ष विरुद्ध नेत्रा असा संघर्ष होताना दिसणार आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोमधून नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश असल्याने राजाध्यक्ष कुटुंबीय तिला गर्भपात करायला सांगत आहेत. मात्र नेत्राचा हा आईपणाचा पहिलाच अनुभव असल्याने ती हे असं करण्यास विरोध करत आहे. एकीकडे रुपाली नेत्राला तिच्या पोटात विरोचकाचा अंश असल्यावरून तिला सतत डिवचत आहे. नेत्राला वाईट वाटेल, दुःख होईल असं वागत आहे. तर दुसरीकडे इंद्राणी, अद्वैत सह राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला तिचे बाळ नष्ट करण्यासाठी सांगत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का? स्पष्टचं बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “या शोची…”   

या सगळ्यामुळे द्विधा मनस्थितीत अडकलेली नेत्रा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. पण असं असूनही ती तिच्या पोटातील बाळ पाडण्यास नकार देत “मातृत्वाची भावना काय असते, हे तुम्हाला कळणार नाही” असं नेत्राला म्हणत आहे. त्यामुळे त्रिनयना देवीच आता एकमेकांच्या विरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. रुपालीविरुद्ध लढण्याऱ्या नेत्रा-इंद्राणी आता स्वतःच एकमेकींच्या विरुद्ध उभ्या राहिल्याने मालिकेत काय नवीन वळण येणार? नेत्रा तिच्या बाळाची सोडवणूक कशी करणार? देवीआई नेत्राच्या मदतीला धावून येणार का? की या सगळ्यात विरोचक त्याचा डाव साधणार हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sakav Webseries Actors
Entertainment

‘गाव गाता…’ नंतर दिगंबर नाईक व अस्मिता खतखते पहिल्यांदाच एकत्र, ‘साकव’वेबसीरिजमध्ये झळकणार

जून 28, 2026 | 11:00 am
Daryabhavani Movie poster release
Entertainment

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास दिसणार ‘दर्याभवानी’मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा उलगडणार

जून 27, 2026 | 4:12 pm
mumbai local train news
Entertainment

“सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही”, मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

जून 27, 2026 | 12:50 pm
Hardik Pandya and Mahieka Sharma get married
Entertainment

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

जून 27, 2026 | 10:33 am
Next Post
Paaru Serial Update

हरीशच्या जाण्याचं सत्य समोर येणार का?, दिशा-दामिनी पारूचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.