सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का? स्पष्टचं बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “या शोची…”   

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi show is scripted? Host Riteish Deshmukh answered know more

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का? स्पष्टचं बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “या शोची...”

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील सर्वांचा आवडता, लोकप्रिय पण तरीही तितकाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे बिगुल वाजले असून सर्वांना या शोबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांना काही खास गोष्टी पाहायला मिळतील. धमाल, मस्ती, गॉसिपसह अनेक गोष्टी या नवीन पर्वात अनुभवायला मिळणार आहेत. परंतु, यंदा शोमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंतचे ‘बिग बॉस मराठी’च्या चार पर्वांचं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे.

‘बिग बॉस’ या शोबद्दल अनेक रहस्य व गुपिते कायमच असतात. या शोबद्दलची अनेक प्रश्ने निरुत्तर असतात. असाच ‘बिग बॉस’ या शोबद्दल कायमच एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो का? ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाला हा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात असतो. अशातच ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाचा होस्ट रितेश देशमुखने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो का? याबद्दल रितेशने खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – घटस्फोटानंतर असं जीवन जगत आहे हार्दिक पांड्याची पूर्वश्रमीची पत्नी, कसा भागवते खर्च?   

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अभिनेता रितेश देशमुखने शोबद्दल भाष्य केले. यावेळी त्याला ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो यावर रितेशचं मत विचारण्यात आलं. यावर रितेशने असं म्हटलं की, “अजून माझ्याकडे या शोची स्क्रिप्ट आली नाही. म्हणून सध्या अन-स्क्रिप्टेडचं चालू आहे”. तसेच यावेळी त्याने मी या शोचा चाहता असल्याने होस्टिंगच्या ऑफरला लगेचच होकार दिला. ‘बिग बॉस’मध्ये येणे हा माझा सन्मान असल्याचेही त्याने म्हटले.

आणखी वाचा – Video : थायलंडमध्ये अक्षरा-अधिपतीचा हनिमून, समुद्रकिनारी जोडप्याचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भारावले

दरम्यान, येत्या २८ जुलैपासून ‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे पर्व बघायला मिळणार आहे. रोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर ‘बिग बॉस’ हा शो बघता येणार आहे. रितेश देशमुखला ‘बिग बॉस’ मराठी ५ मध्ये आपली छाप सोडता येणार का? तो या शोमध्ये काय नावीन्य आणणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस या शोचे व रितेश देशमुखचे अनेक चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की…

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Host Riteish Deshmukhmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
पोटातील बाळ पाडण्याच्या इंद्राणीच्या सल्ल्यामुळे नेत्रा दुःखी, देवीआईच्या लेकींमध्येच मतभेद, विरोचकाने डाव साधला?

पोटातील बाळ पाडण्याच्या इंद्राणीच्या सल्ल्यामुळे नेत्रा दुःखी, देवीआईच्या लेकींमध्येच मतभेद, विरोचकाने डाव साधला?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.