मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2026 | 10:33 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hardik Pandya and Mahieka Sharma get married

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

Hardik Pandya and Mahieka Sharma get married : मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला डेट करत आहे. या जोडप्याच्या समोर आलेल्या एका छायाचित्राने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून माहिका आणि हार्दिकने गुपचूप लग्न केल्याची अटकळ बांधली जात आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये माहिका शर्मा सिंदूर आणि कपाळावर लाल सिंदूर लावलेली दिसत आहे. हार्दिकच्या कपाळावरही खूण आहे. फोटोमध्ये दोघेही माहिकाच्या आईसोबत पोज देताना दिसत आहेत. या फोटोनंतर दोघांनी एका खासगी समारंभात लग्न केल्याची चर्चा आहे. मात्र, हार्दिक किंवा माहिका शर्मा या दोघांनीही लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

हार्दिक पांड्याचे पहिले लग्न नताशा स्टॅनकोविचसोबत झाले होते. या जोडप्याला अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे, परंतु 2024 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर हार्दिकचे नाव जास्मिन वालियाशी जोडले गेले परंतु त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर अभिनेत्री आणि फिटनेस मॉडेल माहिका शर्माने क्रिकेटर हार्दिक पंड्याच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. महिकाही अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानात हार्दिकला चिअर करताना दिसली आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून अनेक यूजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा – “चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत”, मराठी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच थक्क, तर उज्ज्वल निकम…

कोण आहे माहिका शर्मा?
२४ वर्षीय माहिका शर्मा एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. महिका शर्माने भारतीय फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स आणि फायनान्सचा अभ्यास करण्यासोबतच तिने मॉडेलिंग आणि अभिनयातही करिअर केले. ती अभ्यासात खूप हुशार होती आणि तिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत पूर्ण 10 सीजीपीए मिळवले होते. नंतर, तिने तिचे लक्ष मॉडेलिंगकडे वळवले, जिथे तिला कमी वेळात प्रसिद्धी मिळाली.

आणखी वाचा – फुलांच्या पायघड्या, औक्षण अन्…; अनुष्का सरकटेचं सासरी जंगी स्वागत, गोंधळातही जोड्याने थिरकले…

फॅशनच्या दुनियेत तिने अनेक मोठ्या नावांसोबत काम केले आहे. तिने मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, तरुण ताहिलियानी आणि अमित अग्रवाल यांसारख्या प्रसिद्ध डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. तिच्या वाढत्या यशाची ओळख 2024 मध्ये झाली, जेव्हा तिला इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘मॉडेल ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला.तिने म्युझिक व्हिडीओ, शॉर्ट फिल्म्स आणि फोटो प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
mumbai local train news

"सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही", मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.