मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘गाव गाता…’ नंतर दिगंबर नाईक व अस्मिता खतखते पहिल्यांदाच एकत्र, ‘साकव’वेबसीरिजमध्ये झळकणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sakav Webseries Actors

'गाव गाता…' नंतर दिगंबर नाईक व अस्मिता खतखते पहिल्यांदाच एकत्र, 'साकव'वेबसीरिजमध्ये झळकणार

Sakav Webseries Actors : मराठी मालिकाविश्वात अशा काही मालिका असतात ज्या कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. मालिका संपल्या तरी त्या मालिकेतील कलाकार त्या मालिकेतील त्यांच्या भूमिका, त्या मालिकेचा संवाद, त्या मालिकेतील कथा हे सगळंच प्रेक्षकांच्या मनात कायम असतं. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘गाव गाता गजाली’. कोकणी भाषेत विनोदी व आशयघन कथा घेऊन या मालिकेने प्रत्येक कोकणी माणसाच्या मनावर राज्य केलं. केवळ कोकणीच नाहीतर जगभरात या मालिकेचा चाहतावर्ग आहे.

या मालिकेतील अभिनेता दिगंबर नाईक आणि अभिनेत्री अस्मिता खतखते यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. या मालिकेत दिसलेली ही दोन पात्र पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. आणि दोघेही कोकणी भाषेतच राडा घालणार असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या ‘साकव’ या वेबसीरिजच्या ट्रेलर मध्ये दिगंबर नाईक आणि अस्मिता खतखते यांची एकत्र भूमिका पाहायला मिळाली. पती-पत्नीच्या भूमिकेत असलेले हे कलाकार त्यांच्या संवादाने, मालवणी भाषेने, त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसत आहेत.

आणखी वाचा – बाप-लेकाची कथा असलेला ‘साकव’चा ट्रेलर समोर, दिगंबर नाईकांच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बाप-लेकाच्या अनोख्या नात्यावर भाष्य करणारी ही वेबसीरिज असल्याचे समोर आले. या वेबसीरिजमध्ये अर्थात दिगंबर नाईक आणि अस्मिता यांच्या भूमिका पाहणं रंजक ठरेलच. मात्र कथेत कोणता ट्विस्ट असणार हे पाहणं देखील उत्सुकतेच असणार आहे. येत्या २ जुलैपासून प्रत्येक गुरुवारी ही वेबसीरिज इट्स मज्जा ओरोजिनल या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – फुलांच्या पायघड्या, औक्षण अन्…; अनुष्का सरकटेचं सासरी जंगी स्वागत, गोंधळातही जोड्याने थिरकले…

निर्माते सौरिंद्र नाथ दत्ता यांची निर्मिती असलेली ही ‘साकव’ ही वेबसीरिज असून नितीन वाडेवाले यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर सीरिजचे लेखन नितीन पवार यांनी केले आहे. आणि प्रॉडक्शन व क्रिएटिव्ह हेड म्हणून अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे यांनी संभाळली आहे. कोकणात शूट झालेल्या या वेबसीरिजमध्ये कोणते कलाकार असणार हे गुलदस्त्यात असल्याने वेबसीरिज कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: entertainmentmarathi actorSakav Webseries
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
akanksha chamola reveals divorce reason

मुलं नको म्हणून डिवोर्स; सुप्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाचे कारण ऐकून चाहते नाराज, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.