गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही”, मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2026 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
mumbai local train news

"सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही", मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

mumbai local train news : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येवर अभिनेत्री रश्मी देसाईने प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार या 22 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याने अभिनेत्री हादरली आहे. सार्वजनिक सुरक्षा आणि देशातील वाढत्या हिंसाचारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. रश्मी देसाई म्हणाल्या की, या देशात जीवाला किंमत नाही. मुंबईतील एका लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारचा रोशन सुवर्णा नावाच्या प्रवाशासोबत पावसात ट्रेनच्या डब्याचा दरवाजा उघडा ठेवल्याच्या कारणावरून वाद झाला. आत पावसाचे पाणी येत होते. याच वादातून रोशन सुवर्णा याने मयंक लोहारचा भोसकून खून केला. मात्र, रोशन सुवर्णाला अटक करण्यात आली.

मयंकच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना, संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आता रश्मी देसाईही संतापल्या आहेत.
रश्मी देसाईने इंस्टाग्राम स्टोरीवर मृत मयंक लोहारच्या भावाचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आणि लिहिले, “त्याने सांगितले की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि आम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही. कोणीही एखाद्याचा खून करू शकतो आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगू शकतो आणि त्यातून सुटू शकतो. ही आपल्या देशातील सुरक्षितता आणि जीवनाची स्थिती आहे. आयुष्याला किंमत नसते”.

आणखी वाचा – फुलांच्या पायघड्या, औक्षण अन्…; अनुष्का सरकटेचं सासरी जंगी स्वागत, गोंधळातही जोड्याने थिरकले…

रश्मी देसाईने आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने देशातील सध्याच्या परिस्थितीवर संताप व्यक्त केला आहे आणि आता येथे आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले, “उद्या लोक तुम्ही तिथे आहात की नाही याची पर्वाही करणार नाहीत. सरकार काय करतंय माहीत नाही. परिस्थिती बिकट होत चालली आहे. बलात्काराची प्रकरणे उघडकीस येत आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, मात्र ते अत्यंत निराशाजनक आहे. मला अजिबात सुरक्षित वाटत नाही. ही मोठी गोष्ट आहे, पण आपण कुठे चाललो आहोत? आम्हाला ते नको आहे. हा नवा भारत नाही”. रश्मी असं म्हणाली, “सरकार काय करतंय माहीत नाही. परिस्थिती बिकट होत चालली आहे. बलात्काराची प्रकरणे उघडकीस येत आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, मात्र ते अत्यंत निराशाजनक आहे. मला अजिबात सुरक्षित वाटत नाही. हा नवा भारत नाही”.

आणखी वाचा – कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक रमेश लोहार हा विरार येथील रहिवासी असून तो अंधेरी येथील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून कामाला होता. 23 जूनच्या रात्री चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनने तो घरी परतत होता. पोलिसांनी सांगितले की, ट्रेन अंधेरी स्टेशनवर आली तेव्हा पावसात ट्रेनच्या डब्याचे गेट उघडे ठेवण्यावरून मयंक आणि रोशन सुवर्णा यांच्यात वाद सुरू झाला. मयंक दरवाजा बंद करायला सांगत होता, तर रोशनला दरवाजा उघडा ठेवायचा होता. हा वाद इतका वाढला की रोशनने चाकू काढून मयंकच्या पोटात वार केला. मयंकला तत्काळ बोरिवली स्थानकाच्या वैद्यकीय कक्षात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Tags: entertainmentmumbai local trainmurder case
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Daryabhavani Movie poster release

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास दिसणार 'दर्याभवानी'मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा उलगडणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.