झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेच्या रंजक कथानकाने या मालिकेला खऱ्या अर्थाने पसंती मिळत आहे. मालिकेची कथा व कथेत रोज नव्याने येणारे ट्विस्ट या मालिकेची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत.
नुकताच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने ५०० भागांचा टप्पा ओलांडला. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला असून हा खास क्षण जोरदार साजरा करण्यात आला. याचे काही खास क्षण सोशल मीडियादवर पाहायला मिळाले. दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्रिनयना देवीचे गूढ रहस्य दाखवण्यात आले असून याद्वारे नेत्रा-अद्वैतच्या आयुष्याचा रंजक प्रवासही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकासह नेत्रा-अद्वैत यांच्यातील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना चांगलीच भावते.
अशातच या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा-अद्वैत यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. नेत्राला तिचं प्रेम परत मिळालं असं या व्हिडीओमध्ये म्हणण्यात आले असून नेत्राला आणखी एका सत्याचा उलगडा झाला असल्याचे समजत आहे. या व्हिडीओद्वारे नेत्राला रुपालीचं सत्य समजलं आहे की काय? असा प्रश्नही चाहत्यांना विचारण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये पुढे नेत्रा रुपालीचा मागून हात धरत तिच्या मानेवर धारदार शस्त्र ठेवत तिला “तुझा मृत्यू निश्चित आहे” असं म्हणते. त्यामुळे मालिकेला आता पुढे काय रंजक वळण मिळणार? नेत्रा रुपालीला मारणार का? तसेच नेत्रा-अद्वैतच्या आयुष्यात आता कजाय नवीन बदल होणार? हे आगामी भागांत पाहायला मिळेल. दरम्यान, या व्हिडीओखाली मालिकेच्या अनेक चाहत्यांनी त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आगामी भागांसाठीही उत्सुकता दर्शवली आहे.