शुक्रवार, जून 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फाईल्स उघडणार आणि व्यवस्था हादरणार; उषा नाडकर्णी, मंगेश देसाई अभिनीत ‘द महाराष्ट्र फाईल्स’ लवकरच मोठ्या पडद्यावर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2026 | 9:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
The Maharashtra Files Marathi Movie

फाईल्स उघडणार आणि व्यवस्था हादरणार; उषा नाडकर्णी, मंगेश देसाई अभिनीत ‘द महाराष्ट्र फाईल्स’ लवकरच मोठ्या पडद्यावर

The Maharashtra Files Marathi Movie : शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित “द महाराष्ट्र फाईल” हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे . “द महाराष्ट्र फाईल” हा चित्रपट केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेतील छुप्या कार्यपद्धतीचे वास्तव उघड करणारा आरसा आहे. सरकारी कर्मचारी आणि दलालांकडून जनतेची कशी दिशाभूल केली जाते, न्याय कसा लांबवला जातो आणि भ्रष्टाचार कसा बोकाळतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

कागदाच्या ढिगाऱ्यांत लपलेलं सत्य जेव्हा बाहेर येतं, तेव्हा फक्त फाईल्स उघड्या नाहीत तर संपूर्ण व्यवस्था हादरते याचं चित्रण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या २९ मे २०२६ पासून हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. निर्माते, दिग्दर्शक, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.

आणखी वाचा – स्टँड-अप कॉमेडियन तिसऱ्यांदा झाला बाबा, सोशल मीडियावर दाखविली झलक, फोटो समोर

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. येत्या २९ मे रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi actressmarathi movieThe Maharashtra Files
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Lalit Prabhakar As Ajmal Kasab
Entertainment

“चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत”, मराठी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच थक्क, तर उज्ज्वल निकम…

जून 26, 2026 | 11:40 am
Mamachya Govyala Jauya Teaser
Entertainment

धमाल, मस्ती करत गोव्यात ट्रिप; ‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या टिझरने वाढविली उत्सुकता, संत्या, कुशा, बाबा आणि…

जून 26, 2026 | 10:58 am
priyanka chopra on gender roles
Entertainment

“जेवण करणं, साफसफाई करणं स्त्रियांचं काम…”, प्रियांका चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आळशीपणा…”

जून 26, 2026 | 10:30 am
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाची कथा असलेला ‘साकव’चा ट्रेलर समोर, दिगंबर नाईकांच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जून 25, 2026 | 3:36 pm
Next Post
summer skincare

उन्हाळ्यात चेहरा काळवंडतोय?, जाणून घेऊया चेहऱ्यावरील टॅनिंग जाण्याचे ५ सोपे घरगुती उपाय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.