बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वधानंतरही विरोचक पुन्हा जिवंत, देवीआईच्या लेकींवर हल्ला करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नवीन शक्ती हाती?

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 3, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi serial update Virochak comes back to after being killed and tries to attack Netra and Indrani.

वधानंतरही विरोचक पुन्हा जिवंत, देवीआईच्या लेकींवर हल्ला करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नवीन शक्ती हाती?

झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत रुपालीला विरोचकाने दिलेल्या शक्तीमुळे तिने राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वांनाच तिच्या वशमध्ये केले असल्याचे पाहायला मिळाले. विरोचकाने राजाध्यक्ष कुटूंबातील केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस या सर्वांना वश केले असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता तिच्या वशमधून हे सगळेच जण बाहेर आले आहेत आणि घरातील सर्व जण पाचव्या पेटीचा शोध घेत आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या भागात नेत्रा व इंद्राणी यांना पाचव्या पेटीचा शोध लागल्याचेही पाहायला मिळाले.

अशातच कालच्या भागात नेत्राचे बाबा नेत्राला फोन करून “हे सगळं वीपरीतच घडत आहे” असं म्हणतात. यावर नेत्रा त्यांना “काही झालं आहे का?” असा प्रश्न विचरते. यावर नेत्राचे बाबा “देवीआईच्या खालच्या डोंगरात विरोचक नाहीये” असं म्हणतात. यावर नेत्रा व अजिंक्यसह शेखर राजाध्यक्ष चिंतेत पडतात. त्यामुळे बाबांच्या काळजीने नेत्रा वावोशी गावाकडे निघायला जायला निघते. इतक्यात घरातून त्यांना एक मोठी किंचाळी ऐकू येते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

अशातच आता नेत्रा व इंद्राणी या देवीआईच्या लेकी वावोशी गावात जाऊन विरोचकाचा शोध घेतात. देवीआईच्या मंदिराच्या डोंगरात ते विरोचकला शोधत असतात. तेव्हा त्यांना वोरोचक ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी तो नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नेत्रा हे सगळं फोन करून घरातील सर्वांना सांगते. त्यानंतर नेत्राला विरोचक गावात गेला असून त्याने हल्ला केला असल्याचे वाटते आणि इतक्यात तिला झाडाच्या एका पानावर रक्त लागले असल्याचेही दिसते.

आणखी वाचा – रविवारी शुभ योग व सूर्यदेवाच्या कृपेमुळे ‘धनु’ राशीसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या..

तेवढ्यात विरोचक नेत्रा व इंद्रायणी यांच्या मागून कुऱ्हाड घेऊन येत असल्याचे दिसते. यानंतर विरोचक नेत्रावर हल्ला कारणार इतक्यात नेत्रा विरोचकाला पकडते. तेवढ्यात विरोचकाच्या हातून कुऱ्हाड पडते. त्यामुळे नेत्रा इंद्राणीला ती कुऱ्हाड उचलून विरोचकाला मारायला सांगते. मात्र इंद्राणी हल्ला करणार इतक्यात दोघींच्या डोळ्यांवर एक प्रकाश चमकतो आणि यामुळे त्यांना हल्ला करता येत नाही.

आणखी वाचा – “त्याला मी घाबरून राहिले आणि…”, पतीचे व्यसन व त्यांच्या निधनावरून शुभांगी गोखलेंचं भाष्य, म्हणाल्या, “मी लहान असल्यामुळे…”

त्यामुळे आता विरोचकाला कोणती नवीन शक्ती मिळाली आहे का?या शक्तीविरुद्ध देवीआईच्या लेकी कशा लढणार? आणि विरोचकापासून राजाध्यक्ष कुटुंबीयांना व गावकऱ्यांना देवीआईच्या लेकी कशा रोखणार? हे आगामी भागांत पाहायला मिळेल.    

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Marathi actress Sonalee Kulkarni told director apologized

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मागितली होती सोनाली कुलकर्णीची माफी, अभिनेत्रीने स्वत:च सांगितले कारण, म्हणाली, “मला त्रास...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.