छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतात. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकांबद्दल, मालिकांमधील पात्रांबद्दल त्यांना आवडत असलेल्या किंवा आवडत नसलेल्या गोष्टींबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतात. मालिकेतील पात्र, त्याची कथा आवडत असल्यास त्यावर आपलं मत व्यक्त करतात. मात्र काही नवीन ट्विस्ट किंवा नवीन वळण प्रेक्षकांना आवडले नाही, तर त्याबद्दल नाराजीही व्यक्त करतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका.
मालिकेच्या नवीन कथानकाबद्दल प्रेक्षकांकडून नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. मालिकेत रुपालीला संमोहित करण्याची शक्ती मिळाली असून या शक्तीने ती राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध करता आहे. रुपालीने नुकताच अस्तिकाचा वध केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता मालिकेचा आणखी एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्राने कुणाचा तरी वध करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने नपसंतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “अजून किती मूर्खपणा दाखवणार? कथा बनवता येत नाही तर बंद करा मालिका. देवी आईचं काहीच महत्व दाखवलं नाही. म्हणजे देवीआईपेक्षा विरोधक शक्तीशाली आहे का?” तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “सारखं सारखं विरोचकाच्यांच मनाचे होते, जरा देवीचा विजय झालेलाही दाखवलं पाहिजे.”

तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “नेत्रा व इंद्राणी दोघींनी देवीआईच्या देवळात जाणं गरजेचं आहे, त्यांची शक्तीस्तोत्र तरी त्रिनयना देवी आहे. त्यामुळे अजून नका घेऊ रे कोणाचा बळी. त्या रुपालीची भूमिका संपवा आता. अर्थात मग मालिकाही संपेलच म्हणा, काय काय दाखवत आहेत उगाच? कुठे कुठे नेऊन ठेवली आहे मालिका.” असं म्हणत या प्रोमोवर व मालिकेतील या नवीन ट्विस्टला नापसंती दर्शवली आहे. दरम्यान, काहींनी त्यांना ही मालिका आवडत असून त्यांनी या प्रोमोला लाईक्स व कमेंट्सद्वारे संमती दर्शवली आहे.