झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून् प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. याचसह मोठ्या पडद्यावरही सक्षम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या आपलं स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यावरील सध्या तिची सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
अभिनेत्री तिच्या अभिनयाने जितकी चर्चेत असते. तितकीच ती तिच्या सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती युट्यूबवरही तितकीच सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या युट्यूब वाहिनीद्वारे तिच्या तिचे रोजचे दैनंदीन अपडेट्स देत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमधून तिच्या घराची झलक पघायला मिळत आहे.
तितीक्षाने शेअर केलेल्या या युट्यूब व्हिडीओनमध्ये तिच्या घराच्या हॉलची झलक पाहायला मिळत असून तिच्या हॉलमधील अएक वस्तूंनी लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये सोफा, टीपॉय, एक मोठं टेबल लॅम्प, कपात व सुंदर गोलाकृती आरसा पोहायला मिळत आहे. कपाटाच्या बाजूला एक शू-स्टँड (चप्पलसाठीचे स्टँड)ही पाहायला मिळत आहे. तसेच तितीक्षाला तिच्या युट्यूब चॅनेलसाठी मिळालेले सिल्व्हर बटणही एका भिंतीवर लावल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच भिंतीवरील एका फळीवर विठ्ठल-रखुमाई यांची मूर्तीही विशेष लक्ष वेधून घेत आहे. तसेच या मूर्तीच्या बाजूला असलेला सिद्धार्थ-तितीक्षा यांचा लग्नातील फोटो व त्याच्याच बाजूला दिसणारी एक ट्रॉफीही लक्ष वेधून घेत आहे. याचसह घरातील काही सजावटीच्या वस्तु व उत्तम रंगकामाने तितीक्षाचे घर अगदी छान सुंदर व नीटनेटके दिसत आहे.
दरम्यान, तितीक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिची ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक उत्कंठावर्धक वळणांमुळे ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.