प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे. सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियाबरोबरच तितीक्षाचे स्वत:चे एक युट्यूब चॅनेलदेखील आहे. तितीक्षा तावडे ही युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सेटवरील मजामस्ती, आयुष्यातील काही खास क्षण, तसंच तिच्या वैयक्तिक व कामावरील काही लेटेस्ट अपडेट्स तितीक्षा तिच्या या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असते. तिच्या या युट्यूबवरील व्लॉग व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो. (Titeeksha Tawde Youtube Channel Silver Button)
तितीक्षाचा सोशल मीडियावर बऱ्यापैकी चाहतावर्ग आहे. अशातच आता युट्यूबवरही तिने आपला चाहतावर्ग कमावला आहे. तितीक्षाच्या युट्यूब चॅनेलला सिल्व्हर बटण मिळालं आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तितीक्षाने युट्यूबच्या सिल्व्हर बटणचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मी २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात माझं युट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. २०२४ च्या मार्च महिन्यात मला सिल्व्हर बटण मिळालं. हे पोस्ट करायला इतका वेळ का लागला ते माहीत नाही. पण, मला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं आहे”.
आणखी वाचा – गोविंदाबरोबरचा कृष्णा अभिषेकचा वाद मिटला, पण मामी अद्यापही नाराज, म्हणाला, “माफी मागितली तरीही…”
यापुढे अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की, “तुमचं (प्रेक्षकांचे) प्रेम आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या कायम पाठीशी असलेल्या सिद्धार्थला खास धन्यवाद. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”. तर यापुढे तितीक्षाने बहीण खुशबूने तावडेचेही आभार मानले आहेत. यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल कर कृपया करा”. या पोस्टवर चाहत्यांनी व कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अपूर्वा गोरे, ऋतुजा बागवे, शर्वरी जोग, सुकन्या मोने, ऐश्वर्या नारकर यांसह अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
आणखी वाचा – मैत्रिणीच्या हळदीला पोहोचली अंकिता वालावलकर, खास व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “तुझ्यासाठी आनंदी…”
तितीक्षा तावडेच्या युट्यूब चॅनेलचे १ लाख ६७ हजार सबस्क्राइबर्स आहेत. तिच्या अनेक व्हिडिओला हजारोंमध्ये व्ह्यूज मिळतात. दरम्यान, तितीक्षा सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘सरस्वती’, ‘तू अशी जवळी राहा’, ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकांमध्ये ती दिसली होती. ‘शाबास मिथू’ व ‘जयंती’ यांसारख्या चित्रपटांतही ती झळकली आहे.