बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. आजवर अनेक चित्रपटांमध्ये मलायका दिसून आली आहे. तसेच अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉंगमध्येदेखील दिसून आली आहे. वयाच्या ५१ व्या वर्षीदेखील मलायकाच्या सौंदर्याची भुरळ लोकांना पडते. व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही ती चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या वाडिलांनी राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. त्यावेळी तिचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर हा नेहमीच तिच्याबरोबर असलेला दिसून आला. मात्र एका कार्यक्रमादरम्यान अर्जुनने सिंगल असल्याचे सांगून त्यांच्यामध्ये पुन्हा नातं निर्माण झाल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला. अशातच आता यावर मलायकानेदेखील नात्याबद्दलचे मौन सोडले आहे. (malaika arora relationship status)
सध्या मलायका मनोरंजनसृष्टिपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ व फोटोदेखील बघायला मिळतात. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या हिलिंग संदर्भातील अनेक पोस्टही बघायला मिळतात. नुकतीच मलायकाची एक इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिच्या रिलेशनशिपचा स्टेटस बघायला मिळत आहे.
मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझा आताचा स्टेटस १. रिलेशनशिपमध्ये आहे, २. सिंगल आणि ३. हेहेहे यामध्ये तिसऱ्या पर्यायावर मार्क केले आहे. त्यामुळे आत ती सिंगल असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता मलायका कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावरुन खूप चर्चांना उधाण आले आहे.
याआधी अर्जुन कपूरने रिलेशनशिपबद्दल एका दिवाळी पार्टीमध्ये याबद्दल सांगण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अनेक जण मलायकाच्या नावाने चिडवण्यात आले होते. त्यानंतर अर्जुन म्हणाला की, “नाही, मी सिंगल आहे”. २०१८ पासून मलायका व अर्जुन यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. सुरवातीला त्यांनी नात्यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांनी सगळ्यांसमोर नातं स्वीकारलं. दोघंही अनेक ठिकाणी एकत्रितपणे असलेले दिसून यायचे. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळायचे.