शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत मोठा ट्विस्ट! राजाध्यक्षांच्या कुटुंबात केदारची एन्ट्री, ‘हा’ अभिनेता साकारत आहे भूमिका

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 2:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Abhijeet Kelkar new entry in rajadhyaksha family as a Kedar

Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत केदारची एन्ट्री झाली असून ही भूमिका अभिनेता अभिजीत केळकर साकारत आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकाने व कलाकारांच्या उत्तम अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अशातच आता मालिकेत आणखी एक मोठे वळण आले असून नुकताच या ट्विस्टचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi updates)

झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे नुकताच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन प्रोमोमधून मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री झाल्याची पाहायला मिळत आहे आणि हे नवीन पात्र म्हणजे केतकीचा नवरा. मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून केतकीचा नवरा केदार हा गायब होता. मात्र आता त्याची या कुटुंबात एन्ट्री झाली आहे. केदारच्या या एन्ट्रीचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोखाली ‘राजाध्यक्षांच्या घरापासून दूर गेलेली ‘ती’ व्यक्ती घरी परतणार’ असं म्हटलं आहे.    

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोईला थेट मॅसेज, भेटून बोलण्याची केली विनंती, म्हणाली, “तुमच्या फायद्यासाठी…”

या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा असं म्हणते की, “घरातील स्त्रिया एकत्र असल्या की घरातील चैतन्य टिकून असते”. यावर इंद्राणी तिला उत्तर देत असं म्हणते की, “काळजी करु नकोस, या घरापासून गेलेली प्रत्येक व्यक्ती घराकडे परत येणार. घरापासून लांब गेलेली पाऊले पुन्हा घराकडे येतील”. इतक्यात दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो आणि दारात केदार उभा असतो. केदारला पाहून केतकीला अश्रू अनावर होतात. पण घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – Video : मावशी झाल्याचे कळताच तितीक्षाला रडू आवरेना, थेट हॉस्पिटलला जात भेट घेतली अन्,…; व्हिडीओ समोर

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट आला होता. मालिकेने सात वर्षांची लीप घेतली. सात वर्षांनंतर ईशा-रीमा (नेत्राच्या मुली) मोठ्या झाल्या आहेत. पण राजाध्यक्ष कुटुंबात नेत्राला वाटणारं सुख हे खरंतर वरवरचा देखावा असून घर दुभंगलं जातं. नेत्रा मैथिलीचं सगळं करण्यात आणि मुलींच्या संगोपनात गर्क होते. यानंतर राजाध्यक्षांच्या घरातील स्त्रिया एकत्र आल्या आहेत आणि यात केदारचीही भर पडली आहे.  त्यामुळे मालिकेच्या आगामी भागासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: Abhijeet Kelkar new entry in Satvya Mulichi Satavi MulgiSatvya Mulichi Satavi Mulgi NewsSatvya Mulichi Satavi Mulgi updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bollywood actress Sara Ali Khan bought new property in Mumbai Andheri West with her mother Amruta Singh

सारा अली खानच्या नवीन प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, मुंबईत खरेदी केली इतकी महागडी जागा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.