बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सारा अली खान. तिने आतापर्यंत मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आपल्या व्यवसायिक आयुष्याबरोबरच सारा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहत असते. अशातच सध्या तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि याचे कारण म्हणजे तिने मुंबईत घेतलेली नवीन प्रॉपर्टी. साराने आपल्या आईच्या मंदतीने मुंबईत करोडोंच्या दोन प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. मुंबईतील अंधेरी भागात ही प्रॉपर्टी तिने घेतली आहे. ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर मायलेकींनी ही मोठी खरेदी केली आहे. (Sara Ali Khan Property)
सारा अली खानने तिची आई अमृता सिंगबरोबर अंधेरी वेस्टमधील वीरा देसाई रोडवर असलेल्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये २२.२६ कोटींचे दोन ऑफिस खरेदी केले आहेत. या खरेदी केलेल्या दोन्ही मालमत्तांसाठी त्यांनी १.३३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कदेखील भरले आहे. floortap.com नुसार, साराच्या या दोन नवीन कार्यालयांचे क्षेत्रफळ २,०९९ चौरस फूट आहे आणि प्रत्येक कार्यालयाची किंमत ११.१३ कोटी रुपये इतकी आहे. दोन्ही कार्यालयांसाठी १० ऑक्टोबर २०२४ रोजी कराराची नोंदणी झाली होती.
आणखी वाचा – Video : मावशी झाल्याचे कळताच तितीक्षाला रडू आवरेना, थेट हॉस्पिटलला जात भेट घेतली अन्,…; व्हिडीओ समोर
सारा आणि अमृताने गेल्यावर्षी म्हणजेच ११ जुलै २०२३ रोजी याच इमारतीत चौथ्या मजल्यावर एक फ्लॅट ९ कोटी रुपयांना खरेदी केला होता आणि मुद्रांक शुल्कही भरले होते. त्यासाठी ४१.०१ लाख रुपये होते. स्वत: सारा अली खानने अद्याप तिच्या या नवीन मालमत्तेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. दरम्यान, अमृता व सैफ २००४ मध्ये वेगळे झाले होते. तेव्हापासून सारा तिची आई अमृताबरोबर राहते आणि तिचा धाकटा भाऊ इब्राहिम अली खानदेखील त्यांच्याबरोबर राहतो.
तसेच, साराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘ए मेरे वतन’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट १९४७च्या स्वातंत्र्य संग्रामावर बनला होता आणि त्याची निर्मिती करण जोहरने केली होती. या चित्रपटात इमरान हाश्मीचीही महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. त्यानंतर ती आता ‘मेट्रो…ये डेज’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.