सध्या सर्वत्र गणरायच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या गणरायांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच आता टेलिव्हिजन वरील लाडकी अभिनेत्री गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी चांगलीच चर्चेत आली आहे. देवोलिनाने २०२२ साली खासगी पद्धतीने लग्न केले. काही दिवसांपूर्वी तिने आई होण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. आता गणपती सणाच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. गणपतीच्या आगमनाची तयारी करतानाचा व्हिडीओ देवोलिनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Devoleena Bhattacharjee ganpati festival)
हिंदीवरील लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून देवोलिना घराघरात पोहोचली. तिने मुसलमान मुलाशी लग्न केल्याने तिच्यावर टीका देखील करण्यात आली होती. मात्र याकडे तिने दुर्लक्ष केले आणि दोघांचाही सुखाचा संसार असल्याचे दिसून येत आहे. तिने आता गणपती घरात आणण्यासाठीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती देवासाठी फुलांच्या माळा तयार करताना दिसत आहे. अगदी कमी मेकअपमध्ये ती दिसून येत आहे. याबरोबरच बाप्पाचे स्वागत करण्यासाठी त्याचवेळी आरतीचे ताट यार केले आहे.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. नेटकरी तिचे कौतुकदेखील करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही आमच्या भारताचे वैशिष्ट्य आहे. हिंदू मुस्लिम सगळे जण उत्सव साजरा करतात”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “गणपती बाप्पा मोरया, खूप छान वाटले”.
काही महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता. यामध्ये तिचा पती शहनवाज ती बाळाच्या येण्याची वाट बघत आहेत. मात्र अभिनेत्रीने या वृत्ताचे खंडन केले आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी सोशल मीडियावर पंचामृत अनुष्ठानचे फोटो आपलोड केले होते. यामध्ये गरोदर महिला व तिचे मूल आशीर्वाद देण्यासाठी येतात. यामध्ये अभिनेत्री व पतीबरोबर पोज देताना दिसत आहे. यामध्ये दोघंही खूप खुश दिसत आहेत.