Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीचा खेळ दणक्यात सुरू झाला आहे. पहिल्या दोन दिवसांत छान मिळून मिसळून राहिल्यानंतर काही दिवसांनी घरचं वातावरणच बदललं आहे. घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे कलाकारमंडळी तर दुसरीकडे सोशल मीडिया स्टार्सचा धुमाकूळ. या सीझनमध्ये एक दोन नव्हे तर तीन सोशल मीडिया स्टार्सची एन्ट्री झाली आहे. एक आहे कोकण हार्डेट गर्ल अंकिता वालावकर, दुसरा हे गुलिगत धोका फेम सूरज चव्हाण तर तिसरा आहे डीपी अर्थात धनंजय पोवार. (Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar Support)
आपल्या कोल्हापूरी अंदाजानं धनंजय पोवार यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. याच जोरावर त्यांची ‘बिग बॉस मराठी’साठी निवड झाली आहे. करोना लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरबसल्या कंटेंटची निर्मिती केली. घरातल्या छोट्या मोठ्या गंमती जंमती सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून शेअर केल्या. अनेकांचे रील्स प्रचंड व्हायरल झाले. बरेच जणं या काळात सोशल मीडिया स्टार म्हणून लोकप्रिय झाले. त्यापैकी एक धनंजय पोवार. आई आणि सुनेच्या मध्ये अडकलेल्या नवऱ्याचे मजेशीर व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करणं सुरू केलं. त्यांचे हे व्हिडिओ घराघरांत पाहिले गेले.
आणखी वाचा – “रोमान्सही जमत नाही अन्…”, अमृता फडणवीसांचं पती देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य, म्हणाल्या, “राजकारणा शिवाय…”
तर डीपी म्हणजेच धनंजय पोवार यांचं इचलकरंजी इथं सोसायटी फर्निचर हे तीन मजली भव्य असं शोरुम आहे. एक व्यावसायिक म्हणूनही त्यांनी मोठी लोकप्रियता आणि यश मिळवलं आहे. त्यामुळे गावागावात त्यांची अमाप लोकप्रियता आहे आणि याच मुळे त्यानं अगदी छोट्या छोट्या गावातूनही पाठींबा मिळत आहे. धनंजय यांच्या समर्थनार्थ गावागावांत त्यांच्या नावाचे बॅनर आणि पोस्ट लागले आहेत. ‘व्होटिंग करायचं, सपोर्ट करायचं आणि आपल्या डीपी भाऊला जिंकवायचं’ असं लिहिलेलं डीपी भाऊंचं बॅनर सर्व गावागावातून लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’मध्ये दिवसेंदिवस ते आपला खेळ अधिक चांगला बनवत आहेत. प्रत्येक खेळात आणि टास्कमध्ये ते आपली मते ठाम मांडताना दिसत आहेत. टास्कमदये खेळण्याबरोबरच आपल्या विनोदी शैलीने ते सदस्यांचे मनोरंजनही करत आहेत. आताच्या नॉमिनेशनमध्ये त्यांचं नाव आहे, मात्र त्यांची लोकप्रियता पाहता ते आणखी काही दिवस घरात टिकूaन राहतील असं दिसत आहे