शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात पार पडणार पाचवं एलिमिनेशन, ‘या’ सदस्याला मिळणार निरोपाचा नारळ?, प्रोमो समोर

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 7, 2024 | 5:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Nomination will be held in house new promo sheared on social media

Bigg Boss Marathi 5 च्या घरातील कोणत्या स्पर्धकाचा प्रवास संपणार? नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की नॉमिनेशन हे साहजिकच आलं. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. याचसाठी प्रत्येक स्पर्धक आपलं घरातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी इतर सदस्यांना नॉमिनेट करत असतो. अशातच आता ‘बिग बॉस मराठी ५’ चा पाचवा आठवडा सुरु आहे. मागील आठवडयात घरात एलिमिनेशन झाले नव्हतं. मात्र या आठवड्यात घरातील एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. त्यात या आठवड्यात एकूण सदस्य नॉमिनेट झाले आहेत, त्यातील सगळ्यात कमी वोट पडलेला सदस्य आज घराबाहेर जाणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Nomination)

या आठवड्यात एकूण सात सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. यामध्ये आर्या जाधव, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे व धनंजय पोवार या सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सूरज चव्हाण या घरचा नुकताच झालेला कॅप्टन आहे. त्यामुळे  या घरातील त्याचा प्रवास संपणार नसून त्याला या आठडव्यात नॉमिनेशनपासून सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे आता घरातील एकूण सहा स्पर्धक नॉमिनेशनच्या प्रक्रियेत आहेत. यापैकी कुणाचा घरातील प्रवास संपणार यासंबंधीत एक नवीन प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “रोमान्सही जमत नाही अन्…”, अमृता फडणवीसांचं पती देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य, म्हणाल्या, “राजकारणा शिवाय…”

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नॉमिनेशन संदर्भात एक प्रोमो शेअर करण्यात आला असून या आठवड्यात सुरक्षित सदस्याला मोदक मिळणार आहे. तर घराबाहेर जाणाऱ्या सदस्याला एलिमिनेशनचा नारळ मिळणार आहे. या नवीन प्रोमोमध्ये रितेश असं म्हणतो की, “आता होणार आहे नॉमिनेशन. ज्यांना मोदक मिळतील त्यांना मिळणार आहे मोदक तर ज्यांना नारळ मिळणार आहेत ते या घरातून एलिमिनेट होणार आहेत”. रितेशच्या या वाक्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील डीपी दादांची आहे गावागावांत हवा, पाठींब्यासाठी गावकऱ्यांनी केली तुफान पोस्टरबाजी, म्हणाले, “सपोर्ट करायचा आणि…”

त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात आताअ घरातून कोण बाहेर जाणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. या घरातून सूरज कॅप्टन झाल्यामुळे तो सुरक्षित असणार आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सदस्यांपैकी या घरातून आता कोण बाहेर जाणार? कुणाचा या घरातील प्रवास संपणार? हे उद्याच्या भाऊचा धक्कामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बिग बॉस मराठीचे हे आगामी पाचवे नॉमिनेशन आहे.       

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Nominationritiesh deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Deepika Padukone Troll

ना गळ्यात मंगळसूत्र, ना कपाळाला टिकली; दर्शनासाठी आलेल्या दीपिका पदुकोणचा लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.