टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका क्राइम पेट्रोल व ‘माटी की बन्नो’ यामधून समोर आलेली अभिनेत्री सपना सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीचा मुलगा सागर गंगवारचा शव एका नाल्यामध्ये आढळला. यामुळे मुलाच्या मृत्यूने सपनाची अवस्था वाईट झालेली दिसून येत आहे. तसेच नातेवाईकांनी सागरच्या हत्येचा आरोप करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता नक्की हे प्रकरण काय आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया. तसेच याबद्दल काय परिस्थिती काय निर्माण झाली आहे? हे जाणून घेऊया. (sapna singh son death)
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की पोलिसांच्या या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच सपनाने ९० मिनिटांपेक्षा जास्त चाललेले प्रदर्शन मंगळवारी संपले. यावेळी पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या मते दोन मित्रांची ओळख पटली असून त्यांना बुधवारी अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले आहे”.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’ची कथा योग्य नसल्याचं म्हणत अनेकांनी हिणवलं, आता त्याच चित्रपटाची कमाई तब्बल…
सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम यांनी सांगितले की, “शवविच्छेदन रिपोर्टनुसार अजून कोणत्याही कारणांची पुष्टी होऊ शकली नाही. पण अंमली पदार्थ अधिक देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अजून याबद्दलची तपासणी सुरु आहे”. तसेच भुता पोलिस स्थानकाचे पोलिस सुनील कुमार यांनी सांगितले की, “चौकशीदरम्यान अनुज व सनी यांच्याबरोबर अमली पदार्थांचे सेवन केले होते. हे प्रमाण अती झाल्याने सागर बेशुद्ध झालं आणि त्यामुळे घाबरुन सागरचा मृतदेह एका शेतात आणून सोडला”.
दरम्यान जेव्हा सपना मुंबईवरुन बरेलीला परतली तेव्हा तिला मुलाच्या मृत्यूची बातमी समोर आली. मुलाचा मृतदेह बघून ती पूर्णपणे कोसळली. आता तिने मुलाला न्याय मिळावा अशी मागणीदेखील केली आहे. प्रदर्शने केल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून गहेळी आणि भुता पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता पुढे या प्रकरणाला कोणतं वळण लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.