‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेला गायक म्हणजे प्रथमेश लघाटे. प्रथमेशने आजवर त्याच्या गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. प्रथमेश व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नामुळे ही जोडी चर्चेत आली. सोशल मीडियावरही जोडी नेहमीच चर्चेत असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच प्रथमेशने गायनाबरोबरच आणखी एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. (Prathamesh Laghate New Business)
प्रथमेशने गायनसेवेबरोबरच एका नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याबाबत प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत माहिती दिली. प्रथमेश हा मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे प्रथमेशने कोकणाची खासियत असलेल्या आंब्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. गुढीपाडवा जवळ येत असून प्रत्येकजण यंदाच्या सिझनच्या आंब्याची चव चाखयाला चातकासारखी वाट पाहत असतो.
आता ही वाट न पाहायला लावण्यासाठी प्रथमेशने चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आंब्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत, “नमस्कार! २०२४च्या आंब्याच्या सिझनमध्ये तुमचं स्वागत आहे. आंबाप्रेमींच्या सेवेत आत्तापासून पुन्हा रुजू होत आहोत. तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा. गुढीपाडव्यासाठी लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा”, त्याने असं म्हटलं आहे.
“मराठी माणूस व्यवसाय करतोय यापेक्षा मोठी गोष्ट नाही”, “आपल्या लोकांनी व्यवसाय केला की बर वाटतं”, अशा कमेंट प्रथमेशच्या चाहत्यांनी केल्या असून त्याला आणि त्याच्या या नवीन व्यवसायाला पाठिंबा व शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी आंबे आम्हाला मिळतील का?, असा प्रश्न विचाराला आहे.