बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रथमेश लघाटेने पुन्हा सुरु केला व्यवसाय, पोस्ट शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…; म्हणाला, “अव्वल दर्जा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 2, 2024 | 10:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Laghate New Business

प्रथमेश लघाटेने पुन्हा सुरु केला व्यवसाय, पोस्ट शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…; म्हणाला, "अव्वल दर्जा…"

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेला गायक म्हणजे प्रथमेश लघाटे. प्रथमेशने आजवर त्याच्या गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. प्रथमेश व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नामुळे ही जोडी चर्चेत आली. सोशल मीडियावरही जोडी नेहमीच चर्चेत असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच प्रथमेशने गायनाबरोबरच आणखी एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. (Prathamesh Laghate New Business)

प्रथमेशने गायनसेवेबरोबरच एका नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याबाबत प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत माहिती दिली. प्रथमेश हा मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे प्रथमेशने कोकणाची खासियत असलेल्या आंब्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. गुढीपाडवा जवळ येत असून प्रत्येकजण यंदाच्या सिझनच्या आंब्याची चव चाखयाला चातकासारखी वाट पाहत असतो.

आणखी वाचा – लग्नाआधी काजोलचे तोंडही बघायला तयार नव्हता अजय देवगण, अभिनेत्याने केलेला खुलासा, म्हणालेला, “खूप गर्विष्ठ आणि…”

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

आता ही वाट न पाहायला लावण्यासाठी प्रथमेशने चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आंब्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत, “नमस्कार! २०२४च्या आंब्याच्या सिझनमध्ये तुमचं स्वागत आहे. आंबाप्रेमींच्या सेवेत आत्तापासून पुन्हा रुजू होत आहोत. तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा. गुढीपाडव्यासाठी लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा”, त्याने असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – आज ‘या’ राशीच्या लोकांना करिअर व व्यवसायात यश मिळू शकते, जाणून घ्या तुमचे आजच्या दिवसाचे राशी भविष्य

“मराठी माणूस व्यवसाय करतोय यापेक्षा मोठी गोष्ट नाही”, “आपल्या लोकांनी व्यवसाय केला की बर वाटतं”, अशा कमेंट प्रथमेशच्या चाहत्यांनी केल्या असून त्याला आणि त्याच्या या नवीन व्यवसायाला पाठिंबा व शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी आंबे आम्हाला मिळतील का?, असा प्रश्न विचाराला आहे.

Tags: entertainmentprathamesh laghatePrathamesh Laghate New Businessprathamesh laghate post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
govinda affair with actress

‘या’ अभिनेत्रीबरोबर हॉटेलमध्ये पकडला गेला होता गोविंदा, पत्नीची झाली होती अशी अवस्था, कायमची घर सोडून माहेरी गेली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.