अजय देवगणने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. कमीतकमी पण दमदार चित्रपटांमधून आजवर अजयने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अजय देवगण व काजोल ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी आहे. अजय आणि काजोलने १९९९ मध्ये लग्न केले आणि दोघांच्या लग्नाला जवळपास २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला इतकी वर्ष झाली असली तरी सुरुवातीच्या काळात अजयला काजोल आवडत नव्हती, हे सत्य नाकारता येणार नाही. एवढेच नाही तर तो तिला पुन्हा भेटायलाही तयार नव्हता. खुद्द अजय देवगणने त्याच्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. (Ajay Devgn On kajol)
‘पायोनियर’ला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगणने काजोलला पहिल्यांदा कसे भेटलो त्याची आठवण शेअर केली. दोघेही १९९५ मध्ये ‘हुलचल’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. पहिल्याच भेटीत अजयला काजोल खूप गर्विष्ठ आणि बोलकी वाटली. यामुळे अजयला तिला पुन्हा भेटण्याची इच्छाही नव्हती. व्यक्तिमत्वाच्या बाबतीत दोघेही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. मात्र, जे घडायचे असते ते घडते, असाही त्याचा विश्वास आहे.
काजोल इतकं बोलते हे पाहून अभिनेत्याच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आणि त्यांना हे जाणून बरे वाटले की त्यांच्यापैकी एक आहे जो खूप बोलतो, अन्यथा या नात्यात नेहमीच शांतता असती. काजोलपेक्षा अजय फारच कमी बोलतो आणि आवश्यक तेव्हाच बोलतो. मात्र, दोघेही एकमेकांसाठी बनले असल्याचे अजयचे मत आहे. अभिनेत्रीच्या कोणत्या गुणवत्तेने त्याला आकर्षित केले हे समजले नसले तरी ते अगदी स्वाभाविक होते. अजयने असेही सांगितले होते की, त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे हे ठरवण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला.
मात्र, अजय त्याच्या यशाचे श्रेय काजोलला देतो. तो म्हणतो की, “जर माणूस आपल्या घरात आनंदाने राहत असेल तर तो यशस्वी होतो. तर काजोल अजयच्या सर्व कठीण प्रसंगी पाठीशी उभी राहिली. काजोल एकत्र कुटुंबावर विश्वास ठेवणारी अभिनेत्री आहे”. अजयच्या मते, “काजोल त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे”. अजय म्हणाला की, “काजोलचा कुटुंबातील सहभाग पाहून मी बाहेरचा माणूस असल्यासारखे वाटू लागते”.