मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रेमाची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. या कलाकारांमध्ये ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकर याचही नाव आवर्जून घेतलं जाईल. अभिषेकने यंदाच्या गुढीपाडव्याचे औचित्य साधत साखरपुडा केला असल्याचं समोर आलं. साखरपुडा केला असल्याचं सांगत अभिनेता अभिषेक गावकर याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिषेकने रील स्टार सोनाली गुरवसह जाहीर प्रेमाची कबुली दिली. (Abhishek Gaonkar first kelvan)
अभिनेता अभिषेक गावकर व सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा साखरपुडा पडल्यानंतर हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच अभिषेक – सोनालीचं पहिलं केळवण पार पडलं. अभिषेक व सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियावर देखील अनेक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाबाबत अपडेट चाहत्यांसह शेअर केली होती. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनाली व अभिषेकने साखरपुडा केल्यानंतर आता त्यांच्या केळवणाची तयारी सुरु झाली आहे.
आणखी वाचा – “प्रेम, विश्वास काही नसतं…”, दुसऱ्यांदा लग्न मोडल्यानंतर दलजीत कौरची वाईट अवस्था, म्हणाली, “मी आता…”
सोनाली व अभिषेक लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. त्यांच्या पहिल्या केळवणाचे फोटो ही समोर आले आहेत. सोनाली-अभिषेकचं पहिलं केळवण रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलं असल्याचं दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये सोनाली व अभिषेक एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. सोनाली व अभिषेकच्या केळवणाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावरही अभिषेकचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. अभिषेकची गर्लफ्रेंड सोनाली ही कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे. भरपूर फॉलोवर्स असलेल्या सोनालीचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. विविध विषय रीलद्वारे मांडत ती नेहमीच चहात्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या व्हिडीओलाही मिलियन व्ह्यूज मिळालेले पाहायला मिळाले. सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटरमध्ये सोनालीचं नाव आवर्जून घेतलं जात. आता ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.