Bigg Boss Marathi Update : “DP दादा तो रडण्याची नाटकी करतोय”, छोटा पुढारी धनंजय पोवारकडे रडल्यानंतर प्रेक्षकांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले, “आधी कमी लेखलं…”‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून गेले काही दिवस घरात या ना त्या कारणांनी सतत वाद, भांडण, राडे, आरडाओरडा पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’ सुरु होऊन दहा दिवस पूर्ण झाले असून प्रत्येक दिवशी कुणी कुणावर तरी ओरडतच होतं. प्रत्येक दिवशी काहीना काही कारणांवरुन वाद होत होते. या वाद व भांडणांदरम्यान छोटा पुढारीचा एक प्रोमो समोर आला आहे. जो खूपच हळवा व भावुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काल पहिलं कॅप्टनसीचं कार्य पार पडलं. यावेळी गेम अनफेअर झाला त्यामुळे घन:श्यामला रडू कोसळले. छोटा पुढारी’ म्हणजेच घन:श्याम दरवडेने धनंजय पोवारकडे त्याच्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. (Bigg Boss Marathi 5 netizens said Chota Padari tears is fake)
यामुळे गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो. याचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘छोटा पुढारी’ धनंजयकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटतं आणि तो रडू लागतो. यावेळेस घन:श्याम धनंजयकडे असं म्हणतो की, “माझ्या घरच्यांना म्हणायचंय तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही त्यामुळे लोकंही म्हणतात यांचा मुलगा ‘बिग बॉस’मध्ये कसा गेला?”. याच प्रोमोवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी धनंजयलं पाठींबा दिला असून त्याचे कौतुक केलं आहे. मात्र घन:श्यावर अनेकांनी टीका केली आहे. त्याचं वागणं दुटप्पी असल्याचेही म्हटलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”
या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “घनश्यामने कायम धनंजय दादाला कमी लेखलं, कायम धनंजय दादाच्या विरोधात बोलला आणि आता त्यांच्याच जवळ जाऊन मन मोकळं करत आहे, रडत आहे.” तर आणखी एकाने “नॉमिनेशन मधे आलाय म्हणून नाटक सुरू आहे” असं म्हटलं आहे. तसंच एका नेटकऱ्याने “तुझ्यासाठी सहानुभूती आहे नक्कीच…पण कधी कधी तुझ रडणे पण खोटं आहे असं वाटतं. काल अरबाजकडे रडत होता…आता डिपीदादा कडे रडत आहेस” असं म्हटलं आहे”. तसंच “हा असाच रडतो सगळ्यांकडे जाऊन आणि नंतर त्यांच्याच विरोधात बोलतो डबल ढोलकी”, “याला त्याची टीम बदलायची आहे म्हणून हा नाटक करतं आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
याचदरम्यान, डिपीने घन:श्यामला समजावल्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांनी डिपीचे कौतुक केलं आहे. “माणुसकीच दुसरं नाव म्हणजे कोल्हापूर आणि अश्या कोल्हापूरचे आमचे डिपीदादा सगळ्यांना समजून घेतात”,”डिपी दादा एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे”, “डिपी दादा तुमचा अभिमान आहे”, “डिपी दादा दिलदार माणूस”, “याच स्वभावामुळे डिपी दादा आम्ही तुम्हाला विजेता म्हणून पाहतो” अशा अनेक कमेंट्स करत डिपी म्हणजेच धनंजयचे कौतुक केलं आहे.