Swara Bhaskar on Vinesh Phogat : सध्या सर्वत्र Paris Olympic 2024 ची चर्चा सुरु आहे. यावर्षी भारताने चांगली कामगिरी केल्याचेही समोर आले आहे. अशातच आता एक नवीन प्रकरण सुरु झाले आहे. यामध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला या स्पर्धेमध्ये अपात्र घोषित केले आहे. हे ऐकून सर्व भातीयांना धक्का बसला आहे. विनेश 50 किलोग्रामच्या महिलांच्या कुस्तीच्या सामन्यामध्ये प्रवेश करुन एक इतिहास रचला होता. आता सगळ्यांच्या नजरा अंतिम सामन्यावर असतानाच भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मनोरंजन क्षेत्रातून अनेक कलाकारांनी भाष्यदेखील केले आहे.
50 किलोग्राम महिला कुस्ती सामन्यासाठी विनेशचे वजन 100 ग्राम अधिक असलेले सांगितले गेले. तिने हे वजन कमी करण्याचादेखील प्रयत्न केला. तिने रात्रभर सायकलिंग, दोरीउड्या मारल्या. मात्र 7 ऑगस्टला अंतिम सामन्याआधी तिचे वजन वाढलेले दिसून आले ज्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. यामुळे स्वराने या सगळ्या प्रकाराला विरोध करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
स्वरा ही बेधडक विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. विनेशला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवल्यानंतर स्वराने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.तिने सोशल मीडियावर लिहिले की, “कोणाकोणाला 100 ग्राम वजन जास्त असण्यावर विश्वास आहे?”. स्वराचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. तसेच सगळ्यांनीच या घटनेचा निषेध नोंदवला आहे.यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून एका नेटकऱ्याने लिहिले की, “एक मुलगा मुलगी म्हणून सगळे खेळ खेळून गेला तेव्हा असे कोणतेही पॅरामीटर वापरले गेले नाहीत. आता आपात्र ठरवण्यासाठी प्रत्येक नियम लागू केला जात आहे. वाह”.
दरम्यान या स्पर्धेमध्ये अल्जेरियाची स्पर्धक इमान खलिफाच्या लैंगिक चाचणीचा विषय अधिक वाढला होता. इटलीची बॉक्सर कॅरीनिने इमानच्या महिला होण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण या सगळ्यावर पॅरिस ऑलिंपिककडून कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. मात्र आता विनेशच्या आपत्रतेवर भारतीय जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे. अनेकांनी विनेशची आपत्रता ही एक कट असल्याचेही अनेक जण म्हणत आहेत.