शनिवार, सप्टेंबर 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई-बाबा होणार होणार युविका चौधरी व प्रिन्स नरुला?, चिमुकल्या बाळाची चाहुल, म्हणाला, “लवकरच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 23, 2024 | 2:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prince Narula Yuvika Chaudhary Expectiong Baby

लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई-बाबा होणार होणार युविका चौधरी व प्रिन्स नरुला?, चिमुकल्या बाळाची चाहुल, म्हणाला, "लवकरच…"

हिंदी सिनेसृष्टीतील प्रिन्स नरुला व युविका चौधरी ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. दोघेही एकत्र रील व फोटो शेअर करत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. दोघांच्या लग्नाला ६ वर्षे झाली असून आजपर्यंत त्यांना मूलबाळ नाही. मात्र, दोघेही आई-बाबा होणार असल्याचा बातम्या वारंवार येत असतात. अशातच तिचा पती प्रिन्स नरुला याने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा युविकाच्या गरोदरपणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. (Prince Narula Yuvika Chaudhary Expectiong Baby)

प्रिन्स नरुला याने भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये एक या गोष्टीला दुजोरा देत इशारा दिला. दोघांनी प्रिन्स नरुला यांना अनेक प्रश्न विचारले. यादरम्यान भारतीने प्रिन्सला त्याच्या बाळाच्या योजनांबद्दल विचारले. भारती म्हणाली, “तुझा गोला कधी येणार आहे?”, त्याला उत्तर देताना प्रिन्स म्हणाला, “लवकरच”.

आणखी वाचा – Video : “भावा जिंकलंस”, विकी कौशलबरोबर संतोष जुवेकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भारावले, घट्ट मैत्री, धमाल गप्पा अन्…

View this post on Instagram

A post shared by Yuvika chaudhary (@yuvikachaudhary)

प्रिन्सच्या या उत्तराने प्रिन्स व युविका चौधरी आई-वडील होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. यावेळी त्याने पुढे स्पष्ट केले की, तो आतापर्यंत बाळाचे नियोजन का करत नव्हता. प्रिन्स म्हणाला, “मुंबईत घर आणि काम असताना आम्हाला बाळ हवं होतं. जेणेकरून मी इकडे तिकडे पळू नये”. त्यांच्या या वक्तव्यानंतर तो वडील झाला असल्याच्या बातम्या पसरू लागल्या आहेत.

आणखी वाचा – चैतन्यसमोर अर्जुन साक्षीचा खरा चेहरा आणणार का?, कुणालची गर्लफ्रेंड असल्याचं सत्य येणार समोर?, नवा ट्विस्ट

याआधी युविकाने मुलाखतीत सांगितले होते की, ती आणि तिचा पती प्रिन्स नरुला लग्नापासूनच मूल होण्याचा विचार करत आहेत, पण ते देवाच्या हातात आहे. युविका आणि प्रिन्स आता सात वर्षांपासून एकत्र आहेत आणि त्यांनी अनेकदा गर्भधारणेच्या अफवांचे खंडन केले आहे. युविका आणि प्रिन्सचे २०१६ मध्ये लग्न झाले आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. त्यांची पहिली भेट ‘बिग बॉस ९’ मध्ये झाली होती. युविकाला भेटल्यानंतर काही दिवसांनीच प्रिन्सने तिला प्रपोज केले.

Tags: entertainmentPrince Narula Yuvika ChaudharyPrince Narula Yuvika Chaudhary Expectiong Babyyuvika chaudhary baby
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Apurva Namelekar shared some special photos of her in the gym

"शेवंताबाई शेवंताताई झाली", अपूर्वा नेमळेकरने घटवलं इतकं वजन, जिममधील फोटो शेअर केल्यानंतर चाहतेही चक्रावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.