मराठी रंगभूमी गाजवणारा अभिनेता म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. नुकतंच त्याच नियम व अटी लागू हे नाटक रंगभूमीवर चांगलाच गाजतंय. सोशल मीडियावरही संकर्षणाचा बर्यापैकी वावर आहे. (sankarshan karhade new post)
पहा काय म्हणाला सकाळी जेवण करण्याबद्दल संकर्षण (sankarshan karhade new post)
अशातच संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जेवणाच्या थाळीचा हा फोटो शेअर करत त्याने त्याखाली कॅप्शनही दिल आहे. संकर्षण दररोज सकाळी ८.३० वाजता जेवतो. असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, हे ऐकून साऱ्यांचाच नवल वाटलं असेल यांत शंकाच नाही.

संकर्षणने शेअर केलेल्या या फोटोमद्ये त्याच्या आईने केलेलं जेवण दिसतंय. याखाली कॅप्शन देत त्याने लिहिलंय, सुप्रभात .. ???????????? मी तुम्हाला आज एक गंमत सांगतो..???? मी वयाच्या ७ व्या वर्षी पासून आजपर्यंत रोज सकाळी ८ः३० वा. जेवतो.. पोट्टभर.. माझे बाबा बॅंकेत होते.. आता रिटायर्ड झाले. ते बरोब्बर ८.४० ला घरातून निघायचे.. कध्धी त्यांची वेळ चूकली नाही.. आणि ८.३० ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चूकली नाही .. ???? आजही शूट असेल , नसेल .. सकाळी लवकर जायचं असेल नसेल.. मला सकाळी ८.३० झाले कि पोटभर भूक लागते.. आणि मी पोटभर जेवतोच..आज आईने साधं वरण भात.. हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी.. वांग्याचं भरीत .. वाढलं.. अहो काय सांगु कसं वाटलं.. मनसोक्तं हानलं बघा .. माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं..????❤️ सहज शेअर करावं वाटलं ????(sankarshan karhade new post)
====
हे देखील वाचा – या कारणामुळे रद्द झाले दादा एक गुडन्यूजचे प्रयोग
====
त्याने या शेअर केलेल्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी ही कमेंटचा वर्षाव केला आहे. घरच्या आणि आईच्या हातच्या जेवणाची मजा काही औरच ❤️❤️असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, अरे वाह मस्तच..आणि तस पण आधी सुगीचे दिवस होते आता स्विगी चे आहेत त्यामुळे जेवण हे late मिळतं पण तुम्ही सुरू ठेवा.???????? .संकर्षणने तू म्हणशील तसं, दादा एक गुडन्यूज आहे या नाटकांतून रंगभूमी गाजवली. तसेच तो एक उत्तम सूत्रसंचालक आहे.
