मराठी रंगभूमीवर दादा एक गुडन्यूज या नाटकाने हाऊसफुल्लचा बोर्ड फाडला. या नाटकांचे प्रयोग दणक्यात सुरु असताना मात्र या नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. आणि याची बातमी सोशल मीडियावरून प्रिया बापट हिने दिली. प्रिया बापटणे इंस्टाग्रामवरून एक स्टोरी पोसत करत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उमेश आणि प्रिया एकत्र पाहायला मिळतात. दरम्यान या व्हिडिओदरम्यान प्रिया दादा एक गुडन्यूजचे प्रयोग रद्द करण्यात आल्याबाबत सांगतेय. यावेळी त्या दोघांनी प्रेक्षकांची माफीही मागितली आहे. (umesh kamat priya bapat)
पहा का झाले दादा एक गुडन्यूज आहेचे प्रयोग रद्द (umesh kamat priya bapat)
या व्हिडिओत उमेश कामात बोलताना दिसतोय की, गेल्या काही दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे माझा आवाज पूर्णपणे बसला आहे. यापुढे प्रिया बोलताना दिसतेय की, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला व्हॉइसरेस्ट सांगण्यात आली आहे. unfortunately या कारणामुळे आम्हाला उद्या आणि परवाचे ‘दादा एक गुडन्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग रद्द करावे लागत आहेत. आम्ही दोघंही त्याबद्दल तुमची माफी मागतो.
====
हे देखील वाचा – ‘अशोक मामांना आपलं नाव माहित असणं…’पृथ्वीकची अशोक सराफ यांच्यासाठी भावनिक पोस्ट
====
ज्यांनी या नाटकासाठी ऍडव्हान्स बुकींग केलं आहे, त्यांचे पैसे रिफंड केले जातील. यानंतर येणाऱ्या आठवड्यातील विकेंडचे प्रयोग मात्र नक्कीच होतील. कारण हा आठवडा उमेश आराम करेल आणि पुढच्या आठवड्यात तो नक्कीच बरा होईल. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि मला विश्वास आहे की तु्म्ही सर्वजण हे समजून घ्याल”, असे प्रिया बापटने यावेळी सांगितले आहे.(umesh kamat priya bapat)
शिवाय फुलराणी चित्रपटाच्या प्रीमियरला प्रिया बापट आणि उमेश कामात यांनी हजेरी लावली होती. तेव्हाही फुलराणी चित्रपटाबद्दल बोलताना प्रिया म्हणाली आज मी माझ्या आणि उमेशच्या वतीने चित्रपटाला भरपूर शुभेच्छा देतेय, कारण उमेशचा आवाज बसला आहे.