शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी जरी बाबा झालो असलो…”, प्रयोगानिमित्त परदेश दौऱ्याला जाताना मुलांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “मी रडतो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2024 | 9:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Emotional Post

" मी जरी बाबा झालो असलो…", प्रयोगानिमित्त परदेश दौऱ्याला जाताना मुलांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, "मी रडतो…"

उत्तम अभिनेता, कवी, लेखक, सूत्रसंचालक अशा विविधांगी भूमिका साकारत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. सध्या संकर्षण नाटकविश्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. संकर्षण हा सध्या त्याच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रोयोगादरम्यान व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. नियम व अटी लागू हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजत आहे. या नाटकात संकर्षण व अमृता देशमुख ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. (Sankarshan Karhade Emotional Post)

केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर परदेशातही या नाटकाचे चाहते आहेत. म्हणूनच या नाटकाच्या परदेश दौऱ्यानिमित्त संपूर्ण टीम लंडनला जायला निघाली. एअरपोर्टवरील खास फोटो शेअर करत संकर्षणने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणच त्याच्या दोन्ही मुलांवर विशेष प्रेम आहे. सर्वज्ञ व स्रग्वी नावाची संकर्षणाला दोन जुळी मुलं आहेत. नेहमीच तो त्यांच्याबाबतच्या खास पोस्ट सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर करत असतो. आता मुलांना सोडून नाटकाच्या प्रयोगानिमित्त जात असताना संकर्षण भावुक झालेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : भरकार्यक्रमात स्टेजवरच संकर्षण कऱ्हाडेकडून घडली ‘ती’ चूक, राज ठाकरेंनी ऐकताच लगेचच सुनावलं, नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

सोशल मीडियावरुन एक खास पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “‘नियम व अटी लागू’च्या प्रयोगांसाठी लंडनला निघालो आहे. प्रवासाला निघताना मुलांच्या आठवणीत काही सुचलं. मी लहान असताना माझे बाबा बदलीच्या गावी जायचे, आठवडाभर तिकडेच, शनिवार, रविवार यायचे, शनिवारी मी रात्री त्यांची खूप वाट पहायचो, सोमवार पहाटे ते निघणार म्हणून मी रविवारपासून रडायचो. मी जरी बाबा झालो असलो तरी भावनेत धडपड करतोच आहे, आता मुलांना सोडून जातांना मी तसाच रडतो आहे. आता जे माझं होतंय, तेच बाबांचं व्हायचं का?, त्यांनाही माझ्यासारखंच लपूनछपून रडू यायचं का?”, असं त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर बहिणीच्या शेजारीच राहणार तितीक्षा तावडे, खुशबूने सुखी संसारासाठीही दिल्या खास टिप्स, म्हणाली, “लग्न ठरेपर्यंत…”

यापुढे त्याने लिहिलं आहे की, “बाळ बाबाचा बाबा बाळाचा, सहवास सतत मागतं, पण काय करणार कामासाठी लांब जावं लागतं. ऐकेल तो माझं नक्की जर पहात असेल देव, माझ्या बाळांना आणि माझ्या बाबांना आयुष्यभर सुखात ठेव” , अशी प्रार्थनाही त्याने देवाकडे केली आहे.

Tags: entertainmentniyam va ati lagusankarshan karhade emotional postsankarshan karhade instagramsankarshan krhade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Ankita Lokhande And Vicky Jain

"विकीला लग्न करायचे नव्हते", अंकिता लोखंडेचा नवऱ्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, "त्याने बिलासपूरमधील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.