शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर संजय दत्त जखमी, डोक्याला टाके पडले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2023 | 1:59 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sanjay Dutt Accident

Sanjay Dutt Accident

Sanjay Dutt Accident : बॉलिवूड स्टार संजय दत्त सध्या साऊथ इंडस्ट्रीत खूप सक्रिय आहे. बॉलिवूडमधून ब्रेक घेत संजय दत्त काहीसा साऊथ चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. अशातच आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अलीकडेच संजय दत्त त्याच्या आगामी ‘डबल आयस्मार्ट’ चित्रपटाच्या शूटिंग करण्यात व्यस्त आहे. शूटिंग दरम्यान संजय दत्त याचा अपघात झाला असल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर तो जखमी झाला असल्याचं कळतंय. या अपघातादरम्यान त्याला खोल दुखापत झाली असून त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. संजय दत्त तेलगू अभिनेता राम पोथिनेनीसोबत ‘डबल आयस्मार्ट’ चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बँकॉक येथे तलवारबाजीच्या सीन शूट करताना संजय दत्तसोबत ही घटना घडली होती. ज्यामध्ये तो जखमी झाला असून अभिनेत्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. अपघातानंतर काही वेळातच पुन्हा तो शुद्धीत आला आणि त्याने व्यावसायिक कर्तव्य पार पाडत चित्रीकरण पूर्ण केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली असल्याचं समोर आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

हे देखील वाचा – Ashvini Mahangade Short Film: “मुलींची छेडछाड केल्यास…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची अंगावर काटा आणणारी शॉर्ट फिल्म, व्हिडीओ व्हायरल

‘डबल आयस्मार्ट’ हा चित्रपट पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केला आहे. संजय दत्त यांच्यासाठी हा चित्रपट त्यांचं तेलुगु चित्रपटसृष्टीतील पदार्पण म्हणावं लागेल. तर ‘KGF: Chapter 2’ चित्रपटाद्वारे त्याने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. संजयने ‘डबल आयस्मार्ट’ मधील त्याचा पहिला लूकही प्रेक्षकांसमोर आणला आहे.

हे देखील वाचा – ११वेळा ऑपरेशन्स, गंभीर आजार, हाडांची मोडतोड अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची झालीय अशी अवस्था, म्हणाले, “मृत्यूशी लढाई…”

या पोस्टरमधील त्याचा लुक शहरातल्या माणसासारखा दिसतोय. याशिवाय, संजय दत्त त्याच्या आगामी ‘लिओ’ या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीतही उतरणार आहे, ज्यामध्ये तो तमिळ सुपरस्टार थलापथी विजय आणि त्रिशा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे.

Tags: double ismartentertainmentsanjay datt
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
prakash ambedkar on radhika apte marriage scene in made in heaven s2

"मला पल्लवी या पात्राचा…", 'मेड इन हेवन'मधील राधिका आपटेच्या पात्राचं प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक, म्हणाले, "ज्यांनी हा एपिसोड…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.