मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्विमिंग पूलमध्ये फेकलं, धबधब्याखाली धमाल अन्…; ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकारांची धमाल ट्रीप, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2023 | 5:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sahkutumb Sahparivar Actors on Trip

Video : स्विमिंग पूलमध्ये फेकलं, धबधब्याखाली धमाल अन्…; 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील कलाकारांची धमाल ट्रीप, व्हिडीओ तुफान व्हायरल

‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं झालं होतं. अंजी -पशा, सूर्या -सरू, यांची जोडीही प्रेक्षकांची आवडती होती. मालिकेची कथा पूर्ण झाल्याने या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेत जसं की हे कुटुंब प्रत्येक संकटावेळी, सुख दुःखावेळी सहपरिवार दिसत होतं, तसं आता मालिका संपल्यानंतरही हे कुटुंब सहपरिवार धमाल मस्ती करताना दिसत आहे. (Sahkutumb Sahparivar Actors on Trip)

आज ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेला संपून बराच काळ लोटला असला तरी मालिकेतील कलाकारांचं ऑफस्क्रिन बॉण्डिंग अजूनही ऑनस्क्रीन बॉण्डिंगप्रमाणे घट्ट आहे. कलाकारांनी मालिका संपल्यानंतर आपापल्या नव्या कामाला सुरुवात जरी केली असली तरी त्यांनी वेळात वेळ काढून सहकुटुंब एकत्र येत एक छोटीशी ट्रिप एन्जॉय केली आहे.

आणखी वाचा – Video : भर पार्टीत बेभान होऊन नाचला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने, उपस्थितही पाहतच बसले अन्…

मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर निसर्गाच्या सान्निध्यात मज्जा मस्ती करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अभिनेत्री साक्षी गांधी हिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत मालिकेतील कलाकार स्विमिंग पुलचा तसेच धबधब्याखाली आनंद लुटताना दिसत आहेत, शिवाय एकत्र ते भोजन करताना ही दिसत आहेत. इतकंच नव्हे तर कलाकारांनी गाणी म्हणतानाचा व्हिडिओ ही शेअर केला आहे. आणि शेवटी या कलाकारांनी ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेचा एक भाग ही एकत्र बसून पाहिला. ‘लेट पण थेट’ असं कॅप्शन देत साक्षीने ‘सहकुटुंब सहपरिवार’ धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by साक्षी महेश गांधी ???? (@gandhisakshee_)

आणखी वाचा – “खूप चढ-उतार, सुख-दुःख पाहिले पण…”, अश्विनी महांगडेसाठी बॉयफ्रेंडची खास पोस्ट, म्हणाला, “आठ वर्षांपूर्वी…”

या ट्रीपमध्ये सुनील बर्वे, नंदिता धुरी, आकाश नलावडे, अमेय बर्वे, रुचिका धुरी, आकाश शिंदे या कलाकारांना धमाल करताना पाहायला मिळालं. तर किशोरी आंबिये, निमिष कुलकर्णी, पूजा पुरंदरे, कोमल कुंभार यांना त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून या ट्रीपसाठी जाता आलं नाही, त्यामुळे या कलाकारांना त्यांनी खूप मिस केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं. तर गैरहजर असलेल्या कलाकारांनी या व्हिडिओवर कमेंट करत ही ट्रिप मिस केल्याचं म्हटलं.

Tags: akash nalawadeamey barveentertainmentmarathi actormarathi actressmarathi malikamarathi serialnandita dhurisahkutumb sahparivarSahkutumb Sahparivar Actors on Tripsakshi gandhisunil barve
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Avinash Narkar Romantic Post

बायकोला पहिल्यांदा पाहिलं तो दिवस आठवत अविनाश नारकरांनी शेअर केली प्रेमाची आठवण, म्हणाले, "बघितलं पोरी तुला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.