Suraj Chavan Baby : पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं असून त्याच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सूरज बाबा झाला. सूरज चव्हाणला मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि चाहत्यांकडून सूरज आणि संजनावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यातच आता जान्हवी किल्लेकर काहीशी भावुक झाल्याचंही पाहायला मिळाली. सध्या जान्हवीचा हा भावुक झाल्याचा व्हिडीओ ती आता नुकतीच तिच्या भाचीला भेटायला गेली.
मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनं तिच्या इन्स्टा अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये जान्हवी खूपच खूश दिसतेय. आपल्या लाडक्या भावाच्या आयुष्यात आलेल्या या आनंदाच्या क्षणाचा गोडवा जान्हवीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जान्हवी संजनाला भेटायला जाते आणि संजनाला पाहून जान्हवी तिला कडकडून मिठी मारते आणि त्यानंतर बाळाला भेटण्यासाठी जाते. जान्हवी बाळाला हातात घेते आणि त्या बाळाकडे डोळेभरुन पाहते. त्यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळतात. आत्या होताच जान्हवीने संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली.
आणखी वाचा – चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
जान्हवी किल्लेकर हिने व्हिडीओ शेअर करत एक क्युट कॅप्शनही लिहिलं आहे. ती म्हणाली, “आमच्या छोट्या परीचं आगमन झालेलं आहे. खूप-खूप अभिनंदन. मी आत्याबाई झालेय. तसेच, सूरज-संजनाचंही अभिनंदन”. जान्हवीनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. “किती गोड यार…”, “आपुलकी शिकावी तर तुझ्याकडून… जान्हवी आत्या तुझंही अभिनंदन…”, “काहीही म्हणा जान्हवीला पाहून मन भरून आलं”, “किती सुंदर नातं निभावतेय जान्हवी…आता ती आत्या झालीये”, अशाही कमेंट करत नेटकऱ्यांनी जान्हवीचं कौतुक केलंय.




