बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘जवान’चा ट्रेलर काल सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये भरपूर ॲक्शन सीन्स, डायलॉग्स, अभिनेत्याचा अंदाज या सर्व गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट ‘पठाण’सारखाच ब्लॉकबस्टर हिट होणार असल्याचे चाहते म्हणत आहे. याच चित्रपटात शाहरुख खानच्या तोंडी एक डायलॉग आहे. ज्याचा संबंध नेटकऱ्यांनी थेट सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी जोडला. या डायलॉगची चर्चा रंगत असताना समीर वानखेडे यांनी यावर आपलं उत्तर दिलं आहे. (Sameer Wankhede on Viral Dialouge in Jawan Film)
या ट्रेलरमध्ये शाहरुख ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर…’, असा डायलॉग त्याच्या खास अंदाजात बोलला आहे, जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शाहरुखच्या याच डायलॉगची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु असताना आता समीर वानखेडे यांनी यावर प्रत्युत्तर देत शाहरुख व नेटकऱ्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. समीर वानखेडे यांनी ट्विट केलं आहे. ज्यामध्ये निकोल लायन्स यांचा एक कोट शेअर करत त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आयुष्यात मी अनेक संकटांचा सामना केल्यामुळे मला त्याची भीती वाटत नाही”, असा या कोटचा अर्थ आहे. या कोटमधून त्यांनी शाहरुखचे नाव न घेता त्याला टोला लगावला आहे. (Sameer Wankhede on Viral Dialouge in Jawan Film)
हे देखील वाचा – ठुमके, अदा अन्…; गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर तरुणाईचा उदंड प्रतिसाद
I have licked the fire and danced in the ashes of every bridge I ever burned. I fear no hell
— Sameer Wankhede (@swankhede_IRS) August 31, 2023
from you.
-Nicole Lyons
A quote that always inspires me !@ABPNews @news24tvchannel @RoflGandhi_
जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटातील हा डायलॉग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या डायलॉगमधून शाहरुखने थेट समीर वानखेडे यांना टोला लगावला असल्याचे नेटकरी म्हणत आहे. मात्र, आता समीर वानखेडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा – सनी देओलने भररस्त्यात मुलीला छेडलं अन्…; अभिनेत्यानेच सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “तिचा भाऊ माझ्याकडे आला अन्…”
Hello Sameer Wankhede,
— PuNsTeR™ (@Pun_Starr) August 31, 2023
SRK kuchh keh raha tumko. #JawanTrailer pic.twitter.com/YmQWXgaI1y
दरम्यान, समीर वानखेडे यांनी ज्यावेळी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी तो याच चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. मात्र, एक महिन्याने आर्यनला या प्रकरणी क्लीनचिट दिली गेली. पुढे समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.