नाना पाटेकर हे अजब रसायन आहे असं म्हणायला हरकत नाही. रांगडं व्यक्तिमत्व, रफ टफ वागणं बोलणं, स्पष्टवक्तेपणा व हजरजबाबीपणा या गुणांमुळे नानांनी स्वतःची एक जागा सिनेमा सृष्टीत निर्माण केली. हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत आजही नानांच्या नावाचा दबदबा असलेला पाहायला मिळतो. सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाची, त्यांच्या कामाची कायमच चर्चा झाली मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बरेचदा बोललं जात. नानांनी प्रेमविवाह केला हे सगळ्यांना माहित आहे पण खासगी आयुष्यात त्यांचं नशीब तितकं उजळलं नाही. (Nana Patekar Lovestory)
‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा समोर आला आहे. या वृत्तवाहिनीने दिलेल्या मुलाखतीनुसार नानांच्या लग्नसोहळ्याचा व हनीमूनचा खर्च समोर आला आहे. नाना पाटेकर रंगभूमीवर काम करत असताना नीलकांती नावाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी नीलकांती या बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या पदावर काम करत असताना ते दरमहा २५०० रुपये पगार घेत होत्या. तर त्याकाळी नाना एका शोमधून ५० रुपये कमावायचे. दोघांच्या कमाईत ही जोडी आनंदात जगत होती.
शिवाय दोघेही दर महिन्याला बचत करायचे. या दोघांचे लग्न अवघ्या ७५० रुपयांत झाले होते. इतकंच नाही तर ते पुण्याला हनिमूनसाठीही गेले होते. नीलकांती यांनी केवळ एकाच चित्रपटात काम केलं होतं, मात्र त्यांनी एक अभिनेता म्हणून पुढे जाण्यासाठी नाना पाटेकर यांना कायम पाठिंबा दर्शविला. नानांच्या अफेअरमुळे त्या वेगळ्या राहू लागल्या, असं म्हटलं जातं. नाना पाटेकर व नीलकांती यांना मल्हार हा मुलगा असून मागच्या अनेक वर्षांपासून नाना व नीलकांती वेगळे राहतात.
नाना पाटेकर यांचं बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींसह अफेअर होत असं बोललं जातं. त्याचमुळे त्यांची पत्नी नीलकांती व नाना पाटेकर यांच्यात दुरावा आला आणि ते वेगळे राहू लागले.