अभिनेत्री समांथा प्रभु ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दाक्षिणात्य अभिनेता नागाचैतन्यबरोबर लग्नबंधनात अडकली होती. पण लग्नं झाल्यानंतर काही वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सुपरहीट चित्रपटामध्ये तिने केलेले आयटम सॉंग खूपच चर्चेत आले होते. अजूनही या गाण्याची चर्चा होत असते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटही केले आहेत. पण आता ती तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पॉडकास्टमुळे अधिक चर्चेत आली आहे. (samantha ruth prabhu podcast)
समांथाने ‘टेक २०’ नावाचा पॉडकास्ट सुरू केला आहे. या पॉडकास्टमध्ये ती अनेक क्षेत्रातील दिग्गजांबरोबर विविध विषयांवर चर्चा करत असतात. नुकताच तिचा एक पॉडकास्ट व्हायरल होत असून तिच्यावर चुकीची माहिती देण्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओला ३३.२ कोटी व्हयूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये समांथा एका आरोग्य तज्ञाबरोबर लिव्हर डिटॉक्सबद्दल चर्चा करत आहे. पण ही माहिती चुकीची असून प्रेक्षकांची दिशाभूल करत असल्याचे सांगितले जात आहे.
या व्हिडीओमध्ये ती लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी डेंडिलियन रुट्सचा वापर करुन बनवण्यात येणाऱ्या चहाचे सेवन करावे असे सांगिले आहे. तसेच इतर हर्ब्स् चा वापर कसा करावा याबद्दलही चर्चा करण्यात आली. यावर एका आरोग्य तज्ञाने प्रश्न उभा केला आहे आणि ‘द लिव्हर डॉक’ या हँडलवरुन पोस्ट केली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, “अभिनेत्री समांथा रूथ प्रभु एक कलाकार आहे. तिने लिव्हर डिटॉक्स करण्याबद्दल ३३ कोटी लोकांचा चुकीची माहिती दिली आहे. तिच्या पॉडकास्टमध्ये एक अशिक्षित आणि स्वतःला हेल्थ कोच म्हणवणारे व न्यूट्रिशनिस्ट यांचाही सहभाग आहे. व्यक्तीचे शरीर कशाप्रकारे काम करते याबद्दल माहिती नाही. त्यांच्या सोशल मीडियावर सर्व चुकीची माहिती आहे. त्यांनी जडी-बुटीपासून ऑटोइम्युन सारखे आजार बरे होतात. इतके जास्त फॉलोअर्स असणारे विज्ञानाचा वापर करुन अशिक्षित लोकांना पॉडकास्टवर विज्ञान, औषधं व आरोग्य या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी कसे बोलावतात. त्यांच्या अज्ञानामुळे लोकांच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते”.
This is Samantha Ruth Prabhu, a film star, misleading and misinforming over 33 million followers on "detoxing the liver."
— TheLiverDoc (@theliverdr) March 10, 2024
The podcast feature some random health illiterate "Wellness Coach & Performance Nutritionist" who has absolutely no clue how the human body works and has the… pic.twitter.com/oChSDhIbu2
पुढे त्यांनी लिहिले की, “डेंडिलियन एक भाजी आहे. सॅलडमध्ये वापरले जाते. यामध्ये १०० ग्राम डेंडिलियनमुळे तुमच्या पोटॅशियमची गरज पूर्ण होते”. त्यामुळे समंथाने याकडे लक्ष द्यावे आणि यापुढे पाहुणे बोलावताना काळजी घ्यावी असंही त्यांनी लिहिले आहे”.
यावर समांथाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती स्वतः मायोसाईटिस या आजाराने ग्रस्त आहे. यामध्ये सांधे खूप दुखतात तसेच यावर कोणतेही उपचार नसल्याचे सांगण्यात येत आहे.