‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो दिवाने चाहते आहेत. या कार्यक्रमाने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला. कार्यक्रमाच्या विनोदी अंगाने नेहमीच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. कित्येक चाहते असेही आहेत ज्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहिल्याशिवाय घशाखाली घासही उतरत नाही. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या कार्यक्रमातील कलाकारही प्रसिद्धीझोतात आले आहेत. त्यातील एक कलाकार म्हणजे समीर चौघुले. (Samir choughule Fan Moment)
समीर चौघुले यांना हास्यजत्रेत हास्यविर म्हणून ओळखतात. आपल्या विनोदी अभिनयाने ते प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर समीर चौघुले नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे समीर यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. समीर यांना भेटायला त्याचे चाहतेही नेहमीच उत्सुक असतात. बरेचदा समीर त्यांच्या चाहत्यांबरोबरचे अनुभव शेअरही करतात.
अशातच समीर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत समीर यांनी त्यांचा चाहत्यांबरोबरचा एक अनुभव शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत समीर यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत समीर यांचे मुखवटे लावून काही चाहते पाहायला मिळत आहेत. ही पोस्ट शेअर करत समीर यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
पोस्ट शेअर करत ते म्हणाले की, “असे प्रेम करणारे फॅन्स हीच माझी कमाई. माझ्या एका चाहत्याचा दीप डाबरे याचा काल वाढदिवस होता. त्याच्या मित्र मैत्रिणींनी माझ्या चेहेऱ्याचा मास्क घालून त्याला सरप्राइज दिलं. अशावेळी काय बोलावं कळत नाही. फक्त उर भरुन येतो”, असं म्हणत त्यांनी त्याच्या चाहत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर शिवाली परब, सलील कुलकर्णी, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, स्पृहा जोशी या कलाकारांनी कमेंट करत समीर यांचं कौतुक केलं आहे.