बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानचा भाऊ व अभिनेता अरबाज खानने शुक्रवारी आपला ५६वा वाढदिवस साजरा केला. यावेळी आयोजित बर्थडे पार्टीला अरबाजच्या कुटुंबियांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. (Salman Khan Video)
अभिनेता अरबाज खानच्या बर्थडे पार्टीत सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता, मेहुणा आयुष शर्मा त्याचबरोबर अरबाजचा मुलगा अरहान खानने देखील हजेरी लावली होती. मात्र या बर्थडे पार्टीचे विशेष आकर्षण होते, ते सलमान खानचे. सलमान या बर्थडे पार्टीत एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाला. काळ्या रंगाचा टी-शर्ट, गुलाबी रंगाची पँट आणि त्यावर राखाडी रंगाचा शर्ट अश्या वेगळ्या अंदाजात सलमान खान भाऊ अरबाजच्या बर्थडे पार्टीत आला होता.
हे देखील वाचा – ‘हिंदू आहात तर…’ मशिदीत जाण्यावरुन ‘तारक मेहता…’ फेम बबितावर भडकले नेटकरी, म्हणाले, “जय श्रीराम”
सलमान खानच्या या लूकवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात तो त्याच्या गाडीतून उतरताना दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी त्याच्या अनोख्या लूकचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांना सलमानचा हा लूक आवडला नसून कमेंट्सद्वारे सलमानला ट्रोल करत त्याची तुलना बार्बीमधील ‘केन डॉल’शी केली आहे. असे असले तरी, सलमानच्या या लूकची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सध्या होत आहे.
हे देखील वाचा – “फक्त त्या चार मुलींनाच…” चित्रपटात मुख्य भूमिका न मिळण्यावरुन नोरा फतेहीचा संताप, म्हणाली, “मला फक्त…”
अभिनेता सलमान खान सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. लवकरच तो ‘टायगर 3’ चित्रपटात दिसणार असून त्याच्या या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे. (Salman Khan in Arbaaz Khan Birthday Party)