बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कित्येक वर्ष मानसिक आरोग्यासाठी आमिर खान लेकीसह घेत आहे उपचार, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “लाज वाटण्यासारखं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 10, 2023 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aamir and ira talk about mental health

Aamir and ira talk about mental health

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो. कधी हे आजार गंभीरही असू शकतात. त्याबद्दल वेळीच कळलं तर त्यावर उपचार करता येतो. पण असे काही आजार आहेत जे दिसून येत नाही. असे आजार व्यक्तीसाठी खूप घातक ठरतात. मानसिक आजार हा त्यातील एक भाग आहे ज्याचा अंदाज आपल्याला येत नाही. बॉलिवूडचा मिस्ट परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खाननेही या आजाराचा सामना करत होती. तिने यातून बाहेर पडण्यासाठी थेरपीची मदत घेतली आहे. इरा याबाबत अनेकदा बोलताना दिसते. आता स्वतः आमिरनेही  थेरपी घेत असल्याचा खुलासा केला आहे. (Aamir and ira talk about mental health)

आज ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आमिर व इरा खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ते दोघेही मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आमिर व इरा बोलतात, “गणित शिकण्यासाठी जसं आपण शिक्षकांकडे जातो, केस कापण्यासाठी आपण सलॉनमध्ये जातो, घरी जर प्लंबिंग, फर्निचरचं काम असेल तर आपण त्याच्याकडे जातो ज्यांना ते काम माहित आहे, आजारी असलो तर डॉक्टरकडे जातो. आयुष्यात अशी अनेक कामं आहेत जी आपण स्वतः करु शकत नाही. आपल्याला काही वेळेस दुसऱ्यांची मदत लागते ज्याला ते काम माहित आहे. जी आपण स्वतः करु शकत नाही असे निर्णय आपण खूपच सहजतेने न लाजता घेतो”.  

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – “माझा आगाऊपणा वाढला आणि…”, सुचित्रा बांदेकरांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची खास पोस्ट, म्हणाला, “तुझी सहनशीलता…”

ते पुढे सांगतात, “याचप्रमाणे जेव्हा आपल्याला मानसिक गरज असते तेव्हा याच सहजतेने न लाजता आपण अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे जो आपली मदत करु शकेल”. आमिर पुढे स्पष्ट करतो की “मी आणि इरा आम्ही अनेक वर्षांपासून थेरपीचा लाभ घेत आहोत. जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही पण मानसिक किंवा कोणत्या दुःखात आहात तर तुम्हीही अशी व्यक्ती शोधा जी प्रोफेशनल आहे, जी तुमची मदत करु शकेल. यात काहीच लाज वाटण्यासारखं नाही. ऑल द बेस्ट”.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, राज्य सरकारने अभिनेत्याची सुरक्षा वाढवली, धमक्या येण्यामागचं नेमकं कारण काय?

हा व्हिडिओ पोस्ट करत इराने हेल्पलाईन क्रमांक आणि इतर माहिती शेअर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.

Tags: aamir khanbollywood actordaughter ira khanmental health
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
bhushan kadu life

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर केलं दुसरं लग्न, तिलाही गमावलं अन्...; सध्या भूषण कडू आहे कुठे?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.