शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोईला थेट मॅसेज, भेटून बोलण्याची केली विनंती, म्हणाली, “तुमच्या फायद्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 12:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman Khan ex-girlfriend Somy Ali written a post for Lawrence Bishnoi on social media.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक पोस्ट लिहिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटांपेक्षा त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे अधिक चर्चेत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावर आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक पोस्ट लिहिली आहे. लॉरेन्स आपला भाऊ असा उल्लेख केला आहे. तसंच तिने झूमवर कॉल करून बोलायचे आहे. तिला राजस्थानच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे आणि यासाठी सोमीने लॉरेन्सकडे त्याचा मोबाईल नंबरदेखील मागितला आहे. लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करताना सोमी अलीने ही मागणी केली आहे. (Salman Khan Ex Girlfriend)

लॉरेन्स बिश्नोईच्या फोटो शेअर करत सोमीने असं म्हटलं आहे की, “हा लॉरेन्स बिश्नोईला थेट संदेश आहे. नमस्कार लॉरेन्स भाऊ. तुरुंगातूनही तुम्ही झूम कॉल करत असल्याचे मी ऐकले आणि पाहिले आहे. त्यामुळे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. कृपया मला सांगा मी हे कसे करु शकते?  संपूर्ण जगात आमचे आवडते ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचे आहे, पण आधी तुमच्याशी झूम कॉलवर बोलायचे आहे”.

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

आणखी वाचा – खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा सुंदर फोटो, नावही आहे खूप खास, पोस्ट पाहून कौतुकाचा वर्षाव

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “पूजेनंतर काही विषयांवर बोलूया. माझ्यावर विश्वास ठेवा की, हे फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे. कृपया मला तुमचा मोबाईल नंबर द्या, तुमचे उपकार होतील. धन्यवाद.”. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असून त्याच्या टोळीतील सदस्यांनी सलमानच्या सर्वात जवळच्या व्यक्तीची म्हणजेच बाबा सिद्दिकीची हत्या केली. त्यानंतर सलमानबरोबर असणाऱ्यांना त्यांच्याकडून धमकीही देण्यात आली आहे.

आणखी वाचा – राधिका आपटे होणार आई, रेड कार्पेटवर बेबी बंप दाखवत दिली गुडन्यूज, कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव  

सोमी अलीने सलमानवर मारहाण आणि फसवणुकीचा आरोपही केला आहे. मात्र जेव्हा सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता. तेव्हा सोमीने एक पोस्ट शेअर केली होती आणि या पोस्टमध्ये तिने सलमानच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागण्यास तयार असल्याचे लिहिले होते. अशातच तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक पोस्ट लिहिली आहे. 

Tags: bollywood newsSalman Khan Ex GirlfriendSalman Khan Ex Girlfriend Somy Ali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Neha Kakkar and rohanpreet singh

सलमान खाननंतर नेहा कक्करला इशारा, थेट व्हिडीओ शेअर करत केलं सावध, म्हणाले, "अश्लील कृत्ये सहन करणार नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.