Bigg Boss 18 TRP : सलमान खानचा ‘बिग बॉस १८’ या रिॲलिटी टीव्ही शोचा टीआरपी फारसा चांगला नाही. ‘बिग बॉस’शी संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या प्लॅटफॉर्म रिअल खबरीने जेव्हा ‘बिग बॉस’च्या मागील पाच सीझनचा टीआरपी डेटा शेअर केला तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. या सीझनचा टीआरपी खूप आहे वाईट आहे, तर १५ वा सीझन यापेक्षा वाईट होता. इतर प्रत्येक सीझनमध्ये सलमान खान होस्ट केलेल्या रिॲलिटी शोला यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘बिग बॉस’च्या या टीआरपीबद्दल लोकांनीही अनेक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
सलमान खान होस्ट केलेल्या रिॲलिटी शोचा सीझन १३ ते १५ पर्यंत टीआरपीमध्ये सतत घसरण झाली परंतु नंतर सीझन १६ मध्ये हा आलेख वाढलेला पाहायला मिळाला. यानंतर १७ आणि १८व्या सीझनमध्ये पुन्हा टीआरपीमध्ये सातत्याने घसरण होताना दिसली. पण या सीझनसारखी बिकट स्थिती फक्त १५ व्या सीझनमध्येच दिसून आली आहे. खरं तर, असं म्हणता येईल की त्या वेळी टीआरपीही या पातळीच्या खाली गेला होता.
बिग बॉसच्या या टीआरपी आकड्यांवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “एमसी स्टॅन टॉपवर आहे”. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “‘बिग बॉस’ला अजून फ्लॉप व्हायचे आहे. बिग बॉस, तू तुझ्या प्रियकराला आयतं खायला दिल्यास हेच होईल”. एका चाहत्याने लिहिले आहे की, “अधिक पक्षपाती व्हा. पुढच्या सीझनमध्ये ०.९ येईल का ते पाहू. अजून संधी आहे. करणवीर मेहराला फ्रंटफूटवर आणा आणि मग पहा टीआरपीमध्ये किती मोठी वाढ होते”. तर एकाने टोमणा देत म्हटलं आहे की, “या सीझनला सुपर फ्लॉप बनवल्याबद्दल अभिनंदन”.
आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा भाऊ लवकरच अडकणार लग्नबंधनात, लग्नघराचा व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
रिअल खबरीने ‘बिग बॉस’च्या ढासळत्या टीआरपीबद्दल लिहिले आहे की, “‘बिग बॉस १५’ नंतर आणखी एक फ्लॉप सीझन दिल्याबद्दल कलर्स टीव्हीचे अभिनंदन. ‘बिग बॉस १८’ला खूप वाईट पुनरावलोकने मिळत आहेत आणि क्रिएटिव्ह टीम खरोखरच विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहे”. तसंच याविषयी सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, मात्र बहुतांश लोकांनी ‘बिग बॉस’च्या ढासळत्या टीआरपीसाठी विवियन डीसेनाला जबाबदार धरलं आहे.