Anagha Atul Brother Wedding : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुलने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून अनघा घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती, त्यामुळे तिची ही भूमिका विशेष लक्षात राहिली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अनघा सोशल मीडियाद्वारेही तितकीच चर्चेत राहत असते. अशातच अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या लहान भावाच्या लगीनघाईचे काही खास क्षण शेअर केले आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची ती लेक आहे. अभिनेत्रीचा भाऊ अखिलेश भगरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. याबाबत अनघाने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात अखिलेश भगरेच्या लग्नाची सुपारी फुटली. त्यानंतर मे महिन्यापासून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. आता लवकरच अनघाचा भाऊ लग्नबंधनात अडकणार असून लग्नघराचा व्हिडीओ नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अखिलेश भगरे वैष्णवी जाधवशी लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. मे महिन्यात अखिलेश व वैष्णवीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. हा मुहूर्त समारंभ घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. त्यानंतर आता अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. भावाच्या लग्नाच्या तयारीला अनघाने पूर्णपणे झोकून घेतलं आहे. लग्नाच्या तयारीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यांत काही बॅगा भरलेल्या दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अनघाने लिहिलं आहे की, “अखिलेश आणि वैष्णवीच्या लग्नाला चला. रॉक अँड रोल करण्यासाठी सज्ज”.
आणखी वाचा – घरात घालायचे कपडे व मॅक्सी फक्त १५० रुपयांपासून उपलब्ध, सगळ्यात मोठी साइजही सहज मिळणार, नक्की ठिकाण कोणतं?
अनघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नघर पाहायला मिळत असून घराला केलेल्या सजावटीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये नातेवाईक, कुटुंबीयांची लगबगही पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी अनघा व अखिलेशने पुण्यात स्वतःचं हॉटेल सुरुकेलं. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलचं नाव असून या शाकाहारी हॉटेलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला.